बुलढाण्याच्या माजी सरपंच मंगला इंगळे अपात्रता प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने मोठी टिप्पणी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना दोन अपत्यांच्या अटीचा नियम बेकार असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने म्हटलं आहे. या निर्णयावर सु्प्रीम कोर्टाने चिंता देखील व्यक्त केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली/ बुलढाणा : दोन पेक्षा जास्त अपत्य राहिल्यास संबधित व्यक्तीला राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढता येत नाही असा नियम आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या अनेक दशकांपासून हा निर्णय लागू आहे. दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या एखाद्या उमेदवाराने प्रशासनाची दिशाभूल केली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला, आणि निवडणूक जिंकली तरी नंतर संबंधित पद धोक्यात येतं. विरोधकांनी याबाबत तक्रार केली किंवा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आली तर संबंधित निवडून आलेला उमेदवार अपात्र ठरतो, असा नियम आहे.
ग्रामंपचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत, महापालिकांच्या निवडणुकांसाठी हा नियम आहे. याच नियमांशी संबंधित महाराष्ट्रातील एका प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने या नियमावर चिंता व्यक्त केली.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रातील माजी सरपंच मंगला भीमराव इंगळे यांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. मंगळा इंगळे या बुलढाणा जिल्ह्यातील काकोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. पण त्यांना तीन अपत्य असल्याची तक्रार तक्रार विरोधकांनी केली होती.
या प्रकरणी एडिशन कमिश्नरसमोर सुनावणी पार पडली. त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे पाहिल्यानंतर मंगला इंगळे यांचे सरपंचपद अपात्र ठरवले होते. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा, 1959 सेक्शन 14(1)(j-1) अंतर्गत त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते.
यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं. तिथेही मंगळा इंगळे यांना दिलासा मिळाला नाही. यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पार पडत असताना खंडपीठाने या प्रकरणी महत्त्वाची टिप्पणी केली.
सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी काय घडलं?
न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. खंडपीठाने ग्रामपंचायत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ दोन अपत्य असल्यास उमेदवारी लढवता येईल या निर्णयावरच प्रश्न उपस्थित केले. लोकसंख्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या या नियमाने कदाचित आता उद्देश पूर्ण केला असेल, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं.
न्यायमूर्तींकडून बेकार पॉलिसी असल्याचा उल्लेख
यावेळी न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांनी 2003 च्या प्रकरणाचा उल्लेख केला. “ही किती बेकार पॉलिसी आहे? जावेद विरुद्ध हरियाणा राज्य प्रकरणाचा पुन्हा विचार करणे आवश्यक आहे. देश आता बदलला आहे”, असं न्यायमूर्ती नरसिम्हा म्हणाले.
खंडपीठाने नेमकं काय म्हटलं?
“भारताच्या डेमोग्राफिक प्रोफाईलमझ्ये आता खूप बदल झाला आहे. देशाचा एकूण प्रजनन दर आता 1.7 च्या आसपास आहे. विशेष म्हणजे केरळ आणि तामिळनाडूच्या राज्यांमध्ये युरोपीय छोट्या देशांच्या प्रजनन दरांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत लोकसंख्या नियंत्रणासाठी असे नियम लागू ठेवणं बेकायदेशीर ठरु शकतं”, असं खंडपीठाने म्हटलं
“देशातील काही राज्य प्रजनन दराशी झुंजत असताना, लोकसंख्या कमी करण्यासाठी तयार केलेले निर्णय जारी ठेवण्याला काय अर्थ आहे? याशिवाय तीन अपत्य असणं आता सामान्य बाब आहे”, असं खंडपीठाने म्हटलं आहे.
“तुमची पिढी असो किंवा माझी पिढी असो, तीन अपत्य असणं हे क्वचित बघायला मिळतं. त्यामुळे या पॉलिसीची गरज संपलेली आहे. त्यामुळे अशाप्रकारची पॉलिसी वापस घ्यायला हवी. विरोधी उमेदवार या गोष्टीचा हत्यार म्हणून वापर करतात. आम्ही या पॉलिसीने चिंतेत आहोत”, असं वक्तव्य न्यायमूर्ती नरसिम्हा यांनी केलं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा