Illegal Gender Detection Racket: बोगस डॉक्टर सोनुने याने गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपाताचीही तयारी ठेवली होती. सोबत औषधे आणि इन्जेक्शन नेले होते. हे साहित्यदेखील पथकाने जप्त केले.

अनिल रामदास सोनुने असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. मेहकर तालुक्यातील परतापूर येथे रसाळ नावाच्या व्यक्तीच्या घरात बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना मिळाली. त्यांनी तातडीने पीसीपीएनडीटी पथकाला अलर्ट केले. सापळा रचण्यात आला.
Mumbai Local Crime: मुंबई लोकलमध्ये नक्की काय चाललंय? आधी तरुणाला संपवलं, आता Sorry बोलल्यानंतरही एकाला चाकूने भोसकलं
मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता हिवसे, मेहकर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, एपीआय बिरांजे, राठोड, लक्ष्मण कटक, शिवनकर, संदीप भोंडाने, मोहंमद परसुवाले, केशव अवचार, सरकटे तसेच रुग्णालयाच्या अधिपरिचारिका मंगला वायाळ, प्रशांत बोरे, वरिष्ठ लिपिक वायाळ यांनी परतापूर येथे रसाळ याच्या घरावर सकाळी अकरा वाजेपासून पाळत ठेवली.
बोगस डॉक्टर अनिल सोनुने हा दुपारी अडीच, तीनच्या सुमारास रसाळच्या घरात शिरल्यानंतर त्याने महिलेच्या गर्भाचे सोनोग्राफी मशिनद्वारे लिंग निदान सुरू केले. त्याचक्षणी छापा मारून डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत एक पोर्टेबल सोनोग्राफी मशिन जप्त करण्यात आले. डॉक्टरसह घरमालक रसाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
Praful Gudadhe On Vishwas Nagre Patil: विश्वास नांगरे पाटील माझा एन्काऊंटर करतील; नागपूर काँग्रेस शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
तर दुसऱ्या एका घटनेत, यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटप्रकरणी विशेष तपास पथकाने कारवाई केली. तपासादरम्यान, डॉ. सुमंत तुकाराम शितोळे (वय ३८, मंगलमूर्ती हॉस्पिटल, रा. पारगाव, ता. दौंड) आणि बापूराव पंढरीनाथ जांबले (वय ५७, रा. वासुंदे, ता. दौंड) या दोन प्रमुख आरोपींना २६ जूनला अटक केली. न्यायालयाने दोघांनाही एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. सुमंत तुकाराम शितोळे हा आरोपी अण्णासाहेब आप्पा गिरी यांच्याकडून बेकायदा गर्भलिंग निदान झालेल्या गरोदर महिलांना आपल्या पारगाव येथील मंगलमूर्ती हॉस्पिटलला आणून बेकायदा गर्भपात करीत होता. बापूराव पंढरीनाथ जांबले हा रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करीत होता. तो बेकायदा गर्भपातासाठी लागणारी प्रतिबंधित औषधे व इंजेक्शन मुख्य आरोपींना गायकवाड हॉस्पिटलमध्ये पुरवत असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले.

