Headlines

BJP alliance with MIM in Akola Akot Nagar Panchayat; सत्तेसाठी काय पण! भाजपची MIM शी युती, दोन्ही शिवसेनाही सोबती, कुठे घडलं?


Akot Nagar Panchayat : भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करु शकते, या विरोधकांच्या टिकेचा प्रत्यय अकोला जिल्ह्यात आला

BJP MIM Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अकोला : अंबरनाथमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवत भारतीय जनता पक्षाने काँग्रेससोबत युती केल्याचा प्रकार ताजा असतानाच सत्तेसाठी आता भाजपने आणखी एक हातमिळवणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने चक्क एमआयएमसोबत युती केली आहे.

भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करु शकते, या विरोधकांच्या टिकेचा प्रत्यय अकोला जिल्ह्यात आला आहे. अकोट नगरपंचायतीमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही, त्यामुळे पक्षाने एमआयएमला सोबत घेऊन ‘अकोट विकास मंचा’ची स्थापना केली.

या आघाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटकपक्ष तर आहेतच. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचा देखील समावेश आहे. त्यामुळे या आघाडीच्या कडबोळ्यावर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Maharashtra TimesBMC Election च्या तोंडावर ठाकरे बंधूंनी प्रचाराचा पॅटर्न बदलला, ‘ती’ भीती कारण? जाहीर सभांऐवजी फक्त…
दरम्यान, अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘अकोट विकास मंचा’ची नोंद करण्यात आली आहे. यातील सर्व पक्षांना भारतीय जनता पक्षाच्या व्हिपचे पालन करणे बंधनकारक राहणार असून भाजप आमदार रवी ठाकूर हे या आघाडीचे गटनेते आहेत.

कसे आहे पक्षीय बलाबल?

अकोट नगरपंचायतीमध्ये एकूण ३५ जागा आहेत. त्यापैकी दोन जागा रिक्त असून ३३ जागांवर निवडणूक झाली. भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या, परंतु स्वबळावर सत्ता स्थापन करण्यास यश आले नाही. त्यानंतर ५ जागा मिळवणाऱ्या एमआयएमला सोबत घेऊन भाजपने सरकार स्थापन केले आहे.
Maharashtra TimesPune News : पुण्यातील चिमुरडीचा खोकला 8 महिने जाईना, निदान होईना; अचानक नर्स खोकली आणि आईची ‘ती’ सवय डॉक्टरांनी हेरली
या आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन, शिंदेंच्या शिवसेनेचा एक, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन, तर बच्चू कडू यांच्या प्रहारचे तीन सदस्य आहेत. म्हणजेच एकूण २६ जण आहेत. काँग्रेसचे ५ सदस्य आणि वंचित बहुजन आघाडीचे दोन सदस्य विरोधी पक्षात बसणार आहेत.

BMC Election 2026 | मुंबई महापालिकेवर कुणाचा महापौर बसणार? दादरकरांना काय वाटतं?

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे विजयी झाल्या आहेत. १३ जानेवारीला उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रित मतदान करणार आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा