Headlines

buldhana pophali crime 25 year old youth aniket suradkar brutally killed by 5 peoples ; जुना वाद विकोपाला गेला, पाच जणांनी अनिकेतला शेतात गाठलं, निर्घृणपणे संपवलं; पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या


बुलढाणा जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील पोफळी येथे किरकोळ वादातून २५ वर्षीय अनिकेत सुरडकरची पाच जणांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी…

Five arrested for youth murder in Motala buldhana
जुन्या वादातून मोताळा तालुक्यातील अनिकेतची हत्या, ५ जणांना अटक.(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमोल सराफ, बुलढाणा: धामणगाव बढे बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून, सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. शुक्रवारी, २७ फेब्रुवारी रोजी मोताळा तालुक्यातील पोफळी येथील शेतशिवारात एका अंदाजे वय 25 ते 30 वर्षीय युवकाची पाच जणांनी लोखंडी रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत निवृत्ती सुरडकर ( अंदाजे वय 25 ते 30, रा. पोफळी) असे मयताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोफळी येथील विलास राजाराम चौधरी यांच्या शेतात ही घटना घडली. मृतक अनिकेत आणि आरोपी हे एकाच गावातील असून, त्यांच्यात गेल्या काही काळापासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होते. आज याच जुन्या वादाचे पर्यावसान टोकाच्या संघर्षात झाले.

पाच जणांकडून जीवघेणा हल्ला

वाद विकोपाला गेल्यानंतर पाचही आरोपींनी मिळून अनिकेतला गाठले. लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर, छातीवर, मानेवर, पाठीवर आणि पायावर वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Maharashtra TimesSolapur News: मम्मी-पप्पा उठत का नाहीत? तोंडाला फेस पाहून मुली हादरल्या; सोलापुरात पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू

पाच आरोपी अटकेत

या प्रकरणी मृतक अनिकेतचा चुलत भाऊ विजय सुरडकर यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत खालील ५ आरोपींना अटक केली आहे:
१) ब्रम्हानंद ऊर्फ धम्मा राजाराम सुरडकर (वय ३४)
२) लकी ऊर्फ प्रफुल्ल संतोष इंगळे (वय २२)
३) कृणाल जानराव सुरडकर (वय २०)
४) निलेश बाळ बोदडे (वय ३०)
५) क्रिष्णा रमेश अंभोरे (सर्व रा. पोफळी, ता. मोताळा)

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये नायजेरियन तरुणांवर महिलेशी गैरवर्तनाचा आरोप, जमावाकडून चोप

पोलीस कारवाई

धामणगाव बढे पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. (BNS) २०२३ च्या कलम १०३, १८९(२), (४), १९०, १९१(२) (३), ३५१(२) (३), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा