Headlines

Big decision by bjp in bhandara district sanjay savkare removed from guardian minister post and pankaj bhoyar takes over; नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाची चर्चा, पण भाजपने दुसऱ्याच जिल्ह्यात बॉम्ब टाकला; पालकमंत्र्यांची उलचबांगडी


Bhandara News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत भंडाऱ्याच्या पालकमंत्र्यांची उलचबांगडी केली आहे. विद्यमान पालकमंत्री संजय सावकारे हे केवळ विशिष्ट कार्यक्रमांनाच उपस्थित राहत होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर पालकमंत्री बदलाची मागणी वाढली होती. या पार्श्वभूमीवर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

CM Devendra Fadnavis
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाची चर्चा, पण भाजपने दुसऱ्याच जिल्ह्यात बॉम्ब टाकला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
भंडारा: नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुती सरकारमध्ये निर्माण झालेल्या तिढ्याची चर्चा असताना भाजपने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. मंत्री संजय सावकारे यांच्याकडून पालकमंत्रिपदाची जबाबदारी काढून घेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सावकारे यांच्याबाबत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यात नियमित येत नसल्याचा आक्षेप होता. ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, तसंच जिल्हा नियोजन बैठकांसाठीच हजर राहायचे. यामुळे नागरिकांच्या समस्या प्रलंबित होत्या आणि भंडारा जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारीही नाराजी होते. या पार्श्वभूमीवर भंडाऱ्याला स्थानिक पालकमंत्री हवा, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे अखेर सरकारने संजय सावकारे यांना हटवून भोयर यांना संधी दिली. पंकज भोयर हे वर्धा जिल्ह्याचे असल्याने जवळच असलेल्या भंडाऱ्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

पंकज भोयर काय म्हणाले?

“संजय सावकारे यांचंही काम चांगलं होतं. परंतु भौगोलिकदृष्ट्या त्यांना हा जिल्हा दूर पडत असावा आणि मी विदर्भातीलच असल्यामुळे माझ्यावर ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली असावी. महायुतीच्या सरकारमध्ये तीन घटकपक्ष आहेत. या तीनही पक्षातील नेत्यांशी समन्वय ठेवून मी काम करणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शेकडो योजनांची अंमलबजावणी आपण वर्धा जिल्ह्यात केली आहे. त्याच योजनांची अंमलबजावणी आता आपण भंडारा जिल्ह्यात करू. मला ही संधी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो,” अशी प्रतिक्रिया भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यानंतर पंकज भोयर यांनी दिली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा