Headlines

Bhandara 18 Years old Man drown in lake Friends shoot Reel Video; मी सूर मारतो, तू रील काढ; उडी घेताच तरुण बुडाला, मित्र acting समजून व्हिडिओ काढत राहिले, भंडारा येथे मृत्यूचा क्षण कॅमेरात कैद


Bhandara Man drown in Lake : बुडत असल्यामुळे त्याने जिवाच्या आकांताने आरडाओरड केली, तो हात पाय हालवत होता. मात्र हा रीलचा भाग असल्याचा समज करुन घेत मित्र त्याचे चित्रिकरण करत राहिले

Bhandara Man drown Maharashtra Times
भंडारा तरुण बुडाला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात एक दुःखद घटना घडली. सोनेगाव शिवारात एका 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तीर्थराज बारसागडे असं या तरुणाचं नाव आहे. रील व्हिडिओ बनवण्याच्या नादात झाडावरुन बोडी म्हणजेच छोट्या तलावात उडी मारताना तो बुडाला. धक्कादायक म्हणजे हा प्रकार रीलचा भाग आहे, असं समजून त्याचा मित्र व्हिडिओ शूट करत राहिला. दुर्दैवाने तरुणाच्या मृत्यूची घटना कॅमेरामध्ये कैद झाली.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी असलेला 18 वर्षांचा तीर्थराज बारसागडे हा कोंढा येथील जागृती कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होता. तो मित्रांसोबत शेतात गेला होता. शेताजवळच्या छोट्या तलावाच्या काठावर असलेल्या झाडावर तो चढला. त्याने मित्रांना फोटो आणि रील व्हिडिओ बनवायला सांगितलं.

तो झाडावरून तलावात उडी मारत होता. पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. गटांगळ्या खाऊ लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
सोबतच्या मित्रांनी गावकऱ्यांना याची माहिती दिली. बुडत असल्यामुळे त्याने जिवाच्या आकांताने आरडाओरड केली, तो हात पाय हालवत होता. मात्र हा रीलचा भाग असल्याचा समज करुन घेत मित्र त्याचे चित्रिकरण करत राहिले. त्यामुळे मित्र डोळ्यादेखत असूनही तीर्थराजला कोणतीही मदत न मिळाल्याने तो पाण्यात बुडाला.

“त्याने झाडावर चढून बोडीतील पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न विफल ठरला,” असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अड्याळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

पाहा व्हिडिओ :

Maharashtra TimesPune Crime : कोंढवा केसला धक्कादायक वळण, महिला प्रोफेसरच्या मार्गदर्शनाने तरुणीची मित्राविरुद्ध तक्रार?

दोन मावस भावांचा बुडून मृत्यू

दुसरीकडे, गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील शिरपूर शेतशिवारात असलेल्या शेततळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन मावस भावांचा बुडून मृत्यू झाला. विहान ज्ञानेश्वर मडावी, वय 12 वर्ष, रा. शिरपूर आणि रुदय ज्ञानेश्वर मडावी, वय 9 वर्ष, रा. कुरखेडा अशी मृतांची नावे आहेत.

Dhule News | धुळे पोलीस आणि माजी आमदाराच्या मुलामध्ये बाचाबाची, पोलिसांची धडक कारवाई

विहान आणि रुदय हे रविवार सुटीचा दिवस असल्याने सायकलने गावाशेजारी असलेल्या नाजूक मडावी यांच्या शेततळ्यावर गेले. तळ्याच्या काठावर सायकल, कपडे आणि चपला काढून ठेवत आंघोळीसाठी तळ्यात उतरले. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
Maharashtra TimesPune Crime : तुला हॉटेलला नेतो, हवं ते देतो, पण माझ्या… पुण्यात 73 वर्षांच्या म्हाताऱ्याकडून 27 वर्षीय रिसेप्शनिस्टचा विनयभंग
या मार्गाने जाणाऱ्यांना काठावर सायकल, कपडे व चपला दिसून आल्या. संशय वाढल्याने त्यांनी तळ्यात निरखून पाहिले असता दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगताना आढळले. पोलिसांना तातडीने माहिती देऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा