Headlines

big change in lpg connection rules this people may not get cylinder from july 1


येत्या 1 जुलैपासून एलपीजी कनेक्शनबाबत नियम बदलणार आहेत. या नव्या नियमांमुळे काही ग्राहकांचे एलपीजी कनेक्शन बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने जारी केलेले नियम समजून घेणे महत्त्वाचे आहेत.

lpg cylinder
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : येत्या 1 जुलैपासून LPG सिलेंडरबाबत अनेक नियम बदलणार आहेत. या नियमांमुळे काही ग्राहकांचे एलपीजे गॅसचे कनेक्शन बंद होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या ग्राहकांकडे एलपीजी आणि पीएनजी असे दोन्ही कनेक्शन आहेत त्यांचे एलपीजी कनेक्शन तर शंभर टक्के बंद होणार आहे. तसेच ज्या ग्राहकांनी ई-केवायसी केलेली नाही, अशा ग्राहकांना देखील एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एलपीजीबाबत नेमके नवे नियम काय आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.

अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे भारतात एलपीजी सिलेंडरच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. पण आता युद्धाचे ढग कमी झाले असल्या कारणास्तव समुद्रातून एलपीजी गॅसची वाहतूक सुरळीत सुरु आहे. त्यामुळे आता एलपीजी गॅसच्या साठ्याबाबत चिंता नाही. पण तरीही केंद्र सरकारने गेल्या महिन्यात एलपीजीबाबत रेग्युलेशन ऑफ सप्लाय अँड डिस्ट्रीब्यूशन अमेंडमेंट ऑर्डर 2026 लागू केला आहे.

…तर 30 दिवसांत LPG कनेक्शन बंद होईल

नव्या नियमानुसार ज्या व्यक्तीकडे पीएनजी कनेक्शन आहे, म्हणजेच पायपाद्वारे घरापर्यंत गॅसचे कनेक्शन आहे आणि त्याच्याकडे इंडियन, एचपी किंवा भारत गॅसचे LPG कनेक्शन असेल तर त्याचे एलपीजी कनेक्शन पुढच्या 30 दिवसांत बंद होईल. तसेच जर ग्राहक स्वत:हून आपलं एलपीजी कनेक्शन बंद करत असेल तर त्या ग्राहकासाठी कुपन जारी केले जाईल. या कुपनमुळे संबंधित ग्राहकाला भविष्यात एलपीजीचे कनेक्शनची आवश्यकता भासल्यास दिलं जाईल.

PNG साठी 30 जूनला डेडलाईन संपणार

केंद्र सरकारने मार्च महिन्यात महत्त्वाची घोषणा केली होती. ज्या भागात पीएनजीचे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तिथल्या ग्राहकांनी पीएनजी कनेक्शन घ्यावं. ग्राहकांनी तसे न केल्यास तीन महिन्यात त्या ग्राहकांचे एलपीजी कनेक्शन बंद होईल, असा इशारा सरकारने दिला होता. त्यामुळे ज्या ग्राहकांच्या परिसरात पीएनजी कनेक्शन आहे त्यांनी तातडीने पीएनडी कनेक्शन घ्यावे. कारण येत्या 30 जूनला सरकारने याबाबत दिलेली डेडलाईन संपणार आहे.

e-KYC करणं बंधनकारक

केंद्र सरकारने एलपीजी ग्राहकांना e-KYC करणे अनिवार्य केलं आहे. सर्व एलपीजी ग्राहकांनी 30 जून आधी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. तसं न केल्यास कदाचित त्यांचे कनेक्शन बंद होऊ शकतं किंवा त्यांना गॅस सिलेंडर मिळवण्यास अडचणी येऊ शकतात. दरम्यान, ज्यानी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असेल तर त्यांना पुन्हा ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही.

सध्या तरी शहरी भागात 25 दिवस आणि ग्रामीण भागांमध्ये 45 दिवसांआधी एलपीजी सिलेंडरची बुकिंग होत नाही. पण आता होर्मुजची सामुद्रधुनी खुली झाल्याने येत्या 1 जुलैपासून कदाचित याबाबतच्या नियमांमध्ये बदल केली जाऊ शकते, अशी आशा व्यक्ती केली जात आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा