भारतीय महिलांचे वर्ल्डकपमधून ‘पॅकअप’
ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता : द.आफ्रिकन संघ सेमीफायनलमध्ये वृत्तसंस्था/ लॉर्ड्स हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाचे महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. रविवारी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या गेलेल्या करो या मरोच्या महामुकाबल्यात माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवासोबतच भारतीय संघाचा या वर्ल्ड कपमधील प्रवास संपला असून…
