Fuel Crisis In Buldhana: ज्या पेट्रोलपंपांवर पेट्रोल, डिझेल उपलब्ध आहे, तेथे शेकडोंच्या संख्येने कॅनच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूने दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्यादेखील रांगा दिसून येत आहेत.

सध्या खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आला आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैल नसल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने मशागतीसोबतच पेरणीची कामे केली जातात. मात्र, आजघडीला डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. डिझेलअभावी ट्रॅक्टर उभे असल्याने व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत. डिझेल नसल्याने हे सारे पेट्रोलपंपांपर्यंत ट्रॅक्टर आणू शकत नाहीत.
Medical Stores Closed: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद, काय कारण? अर्जंट औषधं लागली तर कुठे कराल संपर्क?
पंपांची संख्या १६६
लाखोंच्या संख्येने असलेल्या वाहनांना इंधन पुरवठा करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात १६६ पेट्रोलपंप कार्यान्वित आहेत. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, जीओ आणि नायरा अशा पाच कंपन्यांच्या पेट्रोलपंपांचा यामध्ये समावेश आहे.
अशी आहे इंधन आवक…
बुलढाणा जिल्ह्यात मंगळवारी ९६० केएल पेट्रोल आणि १५७२ केएल डिझेलची आवक झाली आहे. गायगाव डेपोत हे इंधन उतरविण्यात आले. तेथून त्याचे वितरण सुरू झाले असून, विविध पेट्रोलपंपांवरदेखील त्याची उचल झाली आहे. तर काही पेट्रोलपंपांवर मंगळवारी सायंकाळपर्यंत इंधन पोहोचेल, अशी माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.
Shaktipeeth Highway Protest: शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात सर्वपक्षीय वज्रमुठ; 9 जूनच्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता
‘तुटवडा नाही; अनावश्यक साठा करू नका’
बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाही. नेहमीपेक्षा आपल्याकडे इंधनाचा साठा मुबलक आहे. अनावश्यक इंधन साठा करू नका. काटकसरीने वापर करा. आवक व्यवस्थित सुरू असल्याने कुणीही घाबरून जावू नये, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी केले आहे.
दोनशे लिटरचा साठा; पेट्रोलपंप चालकावर गुन्हा
इंधनाच्या टाक्याशिवाय अतिरिक्त दोनशे लिटर डिझेल बॅरलमध्ये भरून टीनशेडमध्ये साठा करणाऱ्या लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील एका पेट्रोलपंपचालकाविरुद्ध पुरवठा विभागाच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मेहकर ते जालना महामार्गावर अंजनी खुर्द येथे कालिंका माता पेट्रोलपंप आहे. पेट्रोल, डिझेल घेण्यासाठी येथे गर्दी होती. परंतु पंपमालकाने मिळणाऱ्या इंधनातून ग्राहकांना न देता दोनशे लिटर डिझेलचा एका बॅरलमध्ये साठा करून ठेवला. अवैध डिझेल साठा करून ठेवला जात असल्याच्या आरोपाची पडताळणी करण्यासाठी लोणारचे तहसीलदार भूषण पाटील हे पेट्रोलपंपावर पोहोचले. पाहणीत ड्रममध्ये ठेवलेले दोनशे लिटर डिझेल आढळून आले. पुरवठा निरीक्षण अधिकारी आरती दांडगे यांच्या फिर्यादीवरून पेट्रोलपंप संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

