Bhandara Tiger Attack: उमरझरी शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एक शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. संतप्त नागरिकांनी जंगल परिसरात जाळपोळ केली.

शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत माया रामकृष्ण सोनावणे या गंभीर जखमी झाल्या. वनविभागाच्या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या काही स्थानिक नागरिकांनी जंगल परिसरात जाळपोळ केली.
Coal Crisis: राज्यात बारा दिवसांचाच कोळसासाठा! विजेची मागणी वाढली, संचबंदी टाळण्यासाठी महानिर्मितीकडून खबरदारी
शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास माया सोनावणे आणि त्यांचे पती रामकृष्ण सोनावणे हे आपल्या शेतात हिरव्या मिरच्या तोडण्याचे काम करत होते. यावेळी शेतालगतच्या जंगलातून अचानक आलेल्या पट्टेदार वाघाने माया यांच्यावर हल्ला केला. वाघाने आपल्या तीक्ष्ण दातांनी माया यांची मान पकडून त्यांना सुमारे १० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. हा थरार पाहून पती रामकृष्ण यांनी आरडाओरडा केली. जवळच काम करणाऱ्या इतर शेतकरी आणि मजुरांनी तातडीने धाव घेतल्याने वाघाने माया यांना सोडून जंगलात पळ काढला. यात महिलेच्या गळ्याला गंभीर खोल जखम झाली आहे.
Solapur News : ‘मी तुमच्या लायकीचा बाप नाही’; मुलाला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला अन् वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, सोलापूरमध्ये हळहळ
माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी माया सोनावणे यांना तातडीने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. कृष्णा मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय यांनी वाघाला दिसताक्षणी गुंगीचे डार्ट मारण्याचे आदेश दिले आहे.
Maharashtra Politics : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार’, शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचा दावा
तर दुसऱ्या एका घटनेत शेतात काम करत असताना ग्रामपंचायतीच्या कोरड्या विहिरीत तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या श्रमिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मधुकर इसन वरठे (वय ५६, रा. धाबेटेकडी) असे मृतकाचे नाव आहे. ही घटना बोरगाव शेतशिवारात घडली.

