सेवाकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्या – चंद्रकांत पाटील:संत अच्युत महाराज गुरुपौर्णिमा उत्सवात प्रतीकचिन्ह, संकेतस्थळाचे विमोचन
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनुष्याची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा असल्याचे सांगत सेवाकार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. अमरावतीचे भूषण असलेल्या संत अच्युत महाराज यांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे प्रतीकचिन्ह आणि संकेतस्थळाचे विमोचनही करण्यात आले. हा गुरुपौर्णिमा उत्सव औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी…
