सरकारी नोकरीचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्रे दिली:117 युवकांची 3.73 कोटी रुपयांची फसवणूक, बारामती पोलिसांत गुन्हा
राज्य शासनाच्या विविध विभागांसह रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ११७ बेरोजगार युवकांची तब्बल ३ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आरोग्य, वन, जलसंपदा, समाजकल्याण, ओएनजीसी तसेच…
