रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेची खाजगी वाहनातच प्रसुती:औंढा नागनाथ तालुक्यातील प्रकार, आरोग्य यंत्रणेच्या कामाचे पुन्हा एकदा वाभाडे
जवळा बाजार येथे रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने एका अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी अद्यापही सुरुच असतांना रविवारी (ता. 19) पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. औंढा तालुक्यातील काशीतांडा येथील एका गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने खाजगी वाहनातून हिंगोलीकडे आणताना वाहनातच प्रसुती झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले आहे. हिंगोली जिल्हयात…
