आपण एका लोकशाही देशात जन्माला आलो:तुम्हाला राजकारणात रस नसेलही, पण राजकारणाला तुमच्यात रस आहे
बरेच लोक, विशेषतः चाळीस-पन्नास वर्षांचे, नोकरदार लोक आणि आमच्या वयाचे लोकही मला म्हणतात, ‘सर, मला राजकारणात काहीच स्वारस्य नाही.’ मी त्यांना म्हणतो, ‘तुम्हाला राजकारणात स्वारस्य नाही?’ असे म्हणणे म्हणजे जसे कोणी म्हणेल, ‘मला प्रदूषणात काहीच स्वारस्य नाही.’ अरे बाबा, तुम्हाला प्रदूषणात स्वारस्य असो वा नसो, तुम्ही त्याच हवेत श्वास घेत आहात, त्याच वातावरणात जगत आहात,…
