Headlines

हायकोर्ट परीक्षा गोंधळ: अभिजित दिपके यांचे आंदोलन सुरूच:लेखी आश्वासन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, चार मागण्या मांडल्या




छत्रपती संभाजीनगर येथे हायकोर्ट भरती परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेनंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. रविवारी शहर परिसरातील सेव्हन हिलजवळील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने शेकडो उमेदवारांचा पेपर खोळंबला. दूरवरून आलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा फटका बसला असून, परीक्षा केंद्रावर संतापाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच अभिजित दिपके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि प्रशासनासमोर चार प्रमुख मागण्या मांडल्या. दिपके यांनी केलेल्या मागण्यांमध्ये परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, ही परीक्षा हायकोर्टाच्या निरीक्षणाखाली व्हावी, ज्या केंद्रांवर तांत्रिक अडचण आली तेथील परीक्षा रद्द करावी आणि विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये यांचा समावेश आहे. दिपके यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश स्वतः बाहेर येऊन लेखी स्वरूपात हमी देत नाहीत, तोपर्यंत एकही विद्यार्थी किंवा आंदोलनकर्ता जागेवरून हटणार नाही. त्यांनी सरकारवरही टीका करत म्हटले की, सरकार कोणत्याही बाबीवर गंभीर नाही आणि परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुविधा नाहीत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत