Headlines

Ananya Raj : लोकप्रिय अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या 28 व्या वर्षी निधन, कुटुंबीयांनी दिली माहिती, मृत्यूचं कारणही समोर


Ananya Raj Passes Away : लोकप्रिय अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन झालं असून इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

Ananya Raj Passes Away
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली असून २८ वर्षीय अभिनेत्री अनन्या राजचं निधन झालं आहे. अनन्याचं १५ जुलै २०२६ रोजी निधन झालं असून तिच्या कुटुंबीयांनी आता अभिनेत्रीच्या निधनाची माहिती दिली आहे. अभिनेत्री वर्षभरापासून शारीरिक आणि मानसिक आजाराचा सामना करत होती, असं कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

मोनिकाच्या नवऱ्यानं ‘ठरलं तर मग’ मालिकेतील तिच्या नवऱ्याला काय सल्ला दिला?

कुटुंबीयांनी दिली माहिती

अनन्या राजच्या कुटुंबीयांनी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिलं की, ‘सांगण्यास अत्यंत दु:ख होत आहे , १५ जुलै रोजी अनन्याचं निधन झालं. झोपेतच तिनं शेवटचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून ती शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आजाराचा सामना करत होती. यातून बरं होण्यासाठी तिनं वर्षभर लढा दिला. ती एक खंबीर मुलगी होती आणि राणीप्रमाणे आयुष्य जगली. तुझं नसणं कायमचं त्रास देत राहील. तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रयत्न करा.’

कोण आहे अनन्या राज ?

अनन्या राजचा जन्म १० ऑगस्ट १९९८ रोजी झालेला. अनन्या एक लोकप्रिय अभिनेत्री असून तिनं हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. मुंबईत वाढलेल्या अनन्यानं चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओंमधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं आणि हळूहळू इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. अनन्या राज अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिनं २०१६ च्या ‘7 Hours to Go’ या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला, तसेच २०१७ च्या ‘The Final Exit’ या चित्रपटातही एक महत्त्वाची भूमिका साकारली. तिनं २०१९ च्या ‘घोस्ट’ या चित्रपटातील भूमिकेतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या चित्रपटांव्यतिरिक्त, अनन्यानं अनेक वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं आहे. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त, अनन्या राजनं दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe : ‘माधुरी दीक्षितचं लग्न झालं अन् माझा मित्र रडायला लागला’, तुकाराम मुंढेंनी सांगितला मजेदार किस्सा
अनन्या बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीतून गायब होती आणि सोशल मीडियावरही सक्रिय नव्हती. आता अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीनं तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेक कलाकार आणि चाहते अभिनेत्रीला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा