Amravati District Hospital Fire Infants Death: अवघ्या दहा मिनिटांत सर्व ३९ बालकांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

आग लागल्याचे लक्षात येताच परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निरोधक उपकरणांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका आणि धुराचे लोट वेगाने वाढत गेले. कक्ष पूर्णपणे बंदिस्त असल्याने धुराला बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. अखेर कर्मचाऱ्यांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या. धुरामुळे श्वास घेणे अत्यंत कठीण झाले होते. एक परिचारिका तर धुरामुळे जागीच बेशुद्ध पडली. मात्र, आग बाळांच्या खाटांपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्रत्येक बाळाला बाहेर काढण्यासाठी सर्वांची धडपड सुरू होती, असेही कीर्ती यांनी सांगितले.
Amravati Fire : बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावतीत अर्भकमृत्यू, बापाचा काळीज चिरणारा सवाल; आमचं लेकरु आहे तसं द्या, पोस्टमार्टम नको, कुटुंबांचा टाहो‘माझी मुलगी तिथेच दाखल होती. आम्ही सर्वजण झोपलो होतो. पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच धांदल उडाली. डॉक्टर आणि परिचारिका चिमुकल्या बाळांना छातीशी कवटाळून धावत बाहेर येत होत्या. बंदिस्त खोलीतून बाळांचे बारीक रडणे ऐकू येत होते; पण धुराच्या लोटांमुळे आत शिरणे कठीण झाले होते,’ या शब्दांत रुग्णालयात दाखल असलेल्या एका चिमुकलीचे वडील तस्लीम खान यांनी अनुभव मांडला.
रुग्णालयातील एनआयसीयू कक्ष चार भागांत विभागलेला आहे. यातील एका विभागात नऊ नवजात बालकांवर उपचार सुरू होते, तर इतर तीन भागांत ३० बालके होती. शॉर्टसर्किट होऊन व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याचे समजताच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून बचावकार्य सुरू केले. अवघ्या दहा मिनिटांत सर्व ३९ बालकांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
Amravati Fire : अमरावतीत NICU मध्ये आग, तीन नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू; स्वतःचा विचार न करता बाळांना वाचवलं, धाडसी नर्समुळे मोठा हाहाःकार टळलारुग्णालयातील एनआयसीयू कक्ष चार भागांत विभागलेला आहे. यातील एका विभागात नऊ नवजात बालकांवर उपचार सुरू होते, तर इतर तीन भागांत ३० बालके होती. शॉर्टसर्किट होऊन व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याचे समजताच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून बचावकार्य सुरू केले.
अमरावती रुग्णालयातील घटना भीषण आहे. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अन् फायर अलार्मकडे दुर्लक्ष केलं जातं, तुम्हाला काय उपाय सुचतात? कमेंट बॉक्समध्ये सांगा.

