Headlines

IND vs SL : ध्रुव जुरेलने 99 धावांवरून 100 करण्यासाठी घेतले 13 चेंडू, या यादीत एक नंबरला तर गोलंदाज; टॉप 2 मध्ये कोण?


Dhruv Jurel Records : भारताचा स्टार खेळाडू ध्रुव जुरेल याने शतकी खेळी करत कसोटीवर पकड आणखी घट्ट केली. ११५ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या जुरेलने ९९ धावांवर असताना १०० करताना १३ चेंडू घेतले. याआधी दोन खेळाडूंनी जुरेलपेक्षा अधिक चेंडू घेतले, नेमके कोण? जाणून घ्या.

Dhruv Jurel
Dhruv Jurel Records(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : देवदत्त पडिक्कलनंतर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताकडून ध्रुव जुरेलने शतक ठोकले. या शतकाच्या जोरावर दुसऱ्या दिवशी भारताने पहिला डाव ९ बाद ५०३ धावांवर घोषित केला. जुरेलने १७७ चेंडूंत नऊ चौकार व दोन षटकारांसह नाबाद ११५ धावा केल्या. यानंतर दिवसअखेर श्रीलंकेचे दोन फलंदाज आठ धावांवर माघारी पाठवण्यात भारताला यश आले होते. या जोरावर भारताने कसोटीवरील पकड अधिक घट्ट केली. दुसऱ्या दिवशी कसोटीला पावसाचा फटका बसला.

जुरेलने जवळपास पूर्ण दिवस सतावल्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी खेळ संपण्यास एक तास शिल्लक असताना सुरू झाली; पण पावसामुळे त्यात व्यत्यय आला. खेळ पुन्हा सुरू झाल्यावर केवळ तीन षटकांचाच खेळ झाला. यातही प्रसिध कृष्णाआणि मानव सुतारने श्रीलंकेच्या दोघांना बाद करण्यात यश मिळवले. दुसऱ्याच षटकात प्रसिध कृष्णाने लाहिरू उदराला बाद केले. स्लीपमध्ये जयस्वालने त्याचा अप्रतिम झेल टिपला. तिसरे षटक सुतारने टाकले. त्यातही एका अपीलवर जीवदान मिळाले; पण प्रभात जयसूर्याला दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर पायचीत टिपण्यात सुतारलायश आले. श्रीलंका संघ ४९५ धावांनी पिछाडीवर आहे.

Maharashtra TimesYashasvi Jaiswal : ज्याची भीती तेच घडलं! यशस्वी जयस्वालला भांडणं पडली महागात, ICCची आतापर्यंतची मोठी कारवाई
ध्रुव जुरेलने ९९ धावांवर असताना शतक पूर्ण करण्यासाठी १३ चेंडू घेतले. शतक पूर्ण करण्यासाठी असे सर्वाधिक चेंडू घेणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सर्वाधिक चेंडू रविचंद्रन अश्विन याने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध ग्रॉस इस्ले या मैदानावरील कसोटीमध्ये घेतल होते. दुसऱ्या क्रमांकावर मुरली विजय असून त्याने २०१४ मध्ये इंग्लंडविरूद्ध १४ चेंडू घेतले होते. सातव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजीस आल्यावर शतक केलेले भारतीय फलंदाज. ध्रुव जुरेलपूर्वी हार्दिक पंड्या आणि पडिक्कल आहेत.

Maharashtra TimesDhruv Jurel Century News : ध्रुव जुरेलने 115 धावा कुटल्या, नाबाद राहिला; तरीही नावावर लागला नकोसा विक्रम
ध्रुव आणि सारांश जैनने ५ बाद ३०० वरून पुढे खेळायला सुरुवात केली. सकाळच्या सत्रातील दुसऱ्याच षटकात असित फर्नांडोने सारांशला बाद केले. यानंतर पहिल्या दिवशी जखमी होऊन माघारी परतलेला ऋषभ पंत फलंदाजीस आला. या जोडीने श्रीलंकेच्या गोलंदाजांची कसोटी बघितली. पहिल्या दिवशी पंत उसळत्या चेंडूवर जायबंदी झाला होता. त्यामुळे त्याचे उसळल्या चेंडूंनी स्वागत झाले. मात्र, पंतने स्टेडियमच्या छपरावर षटकार मारत आपली तयारी दाखवली. पंतची आक्रमकता पाहून जुरेलने एकेरी धावेवर भर दिला. तो कोणताही धोका पत्करत नव्हता.

Maharashtra TimesShubman Gill : कडक ना भावा! अर्धशतक करूनही शुभमन गिलने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा भारताचा पहिलाच कर्णधार
श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी खेळपट्टीकडून साथ मिळवण्यास सुरुवात केल्यावरही पंत आक्रमकच होता. जुरेल-पंतने १५२ चेंडूंत ११२ धावांची भागीदारी रचली. या जोडीने उपाहारापर्यंत भारताला चारशे धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. अखेर केशर नुवांतला ही जोडी फोडण्यात यश आले. त्याने पंतला माघारी पाठवले. पंतने ८९ चेंडूंत सहा चौकार व दोन षटकारांसह ६३ धावा केल्या. यानंतर जुरेलने तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन पाचशे धावांचा टप्पा ओलांडला. जुरेलने मानव सुतारसह ७६ चेंडूंत ३९, मोहम्मद सिराजसह ६९ चेंडूंत ३१, तर प्रसिध कृष्णासह १४ धावांची अभेद्य भागीदारी रचली.