Headlines

Amey Wagh TVF Movie:’पंचायत’, ‘गुल्लक’, ‘कोटा फॅक्टरी’ च्या निर्मात्यांची मराठीत एन्ट्री, पोस्टर समोर; अमेय वाघच्या भूमिकेची उत्सुकता


मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच कौटुंबिक आणि विनोदी चित्रपटांचा प्रभाव राहिला आहे. मात्र, अलिकडच्या काळात मराठी प्रेक्षकांची आवड बदलताना दिसत असून हॉरर (भयपट) आणि सस्पेन्स-थ्रिलर (गूढपट) या प्रकारातील चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही वर्षात केवळ हॉररच नाही, तर सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांनाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘दशावतार’ , ‘जारण’, ‘घबाडकुंड’ सारख्या चित्रपटांनी पौराणिक कथा आणि सस्पेन्सचा उत्तम मेळ साधत प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. यात आता आणखी एका सिनेमाची भर पडणार आहे. ‘बायंगी पळायची नाही; टाळायची’ असं या सिनेमाचं नावआहे. विशेष म्हणजे ‘टीव्हीएफ’ नं त्यांच्या या पहिल्या सिनेमाची घोषणा केली आहे.

विविध भूमिका साकारून अभिनेता अमेय वाघ नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतो. आता तो आणखी एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘टीव्हीएफ’च्या या पहिल्या मराठी सिनेनिर्मितीत तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. वेगळ्या भूमिका आणि सहज अभिनयशैलीमुळे प्रेक्षकपसंतीस उतरलेला अमेय, ‘बायंगी पळायची नाही; टाळायची’ या चित्रपटातून झळकणार आहे.

कोकणातील अलौकिक लोककथेवर आधारित सिनेमा

सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आलं असून सिनेमा कोकणातील अलौकिक लोककथेवर आधारित असल्याचं दिसून येतंय. सिनेमा हॉरर-कॉमेडी प्रकारात मोडणारा सिनेमा आहे. कोकणातील लोककथेनुसार, ‘बायंगी’ ही नारळात अडकलेली एक अलौकिक शक्ती (आत्मा) मानली जाते, जी तिच्या मालकाला श्रीमंत बनवू शकते. परंतु, या इच्छापूर्तीसोबत एक धोकादायक अट जोडलेली असते. चार तरुण मित्रांना अचानक ही बायंगी सापडते आणि तिथून सुरू होतो एक रंजक, विनोदी आणि थरारक प्रवास, असं सिनेमाचं कथानक असणार आहे.

देशभरात ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘कोटा फॅक्टरी’, ‘अॅस्पिरंट्स’ यांसारख्या लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या कंटेंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या टीव्हीएफची ही पहिली मराठी सिनेनिर्मिती असल्यानं या चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता आहे. अलौकिक लोककथांच्या पार्श्वभूमीवर तयार होणारी ही कथा मनोरंजन, रहस्य आणि वेगळ्या धाटणीचा अनुभव देणारी असेल, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘गुल्लक ५’चा दिग्दर्शक अभय राऊत यानं केलं आहे. अमेयसोबत या चित्रपटात हार्दिक जोशी, मनमीत पेम आणि अविनाश खेडेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Maharashtra TimesTMKOCचं वेड, ९०० किमी प्रवास करून मुंबई गाठली, गस्ती पथकानं अल्पवयीन मुलाला घेतलं ताब्यात; असित कुमार मोदींची प्रतिक्रिया चर्चेच
द व्हायरल फीव्हर (टीव्हीएफ) विषयी

२०१२ मध्ये अरुणाभ कुमार यांनी स्थापन केलेले द व्हायरल फीव्हर (टीव्हीएफ) हे भारतातील अग्रगण्य डिजिटल-प्रथम आशय निर्मिती स्टुडिओ असून देशातील सर्वाधिक मान्यता प्राप्त कथाकथन ब्रँडपैकी एक आहे. गेल्या दशकात टीव्हीएफने सांस्कृतिकदृष्ट्या जवळचा आणि सर्वांनाच आपलासा वाटणारा आशय स्केचेस, मिनी-मालिका आणि दीर्घ-स्वरूपाच्या कार्यक्रमांद्वारे सादर करत भारतीय मनोरंजनविश्वाला नवी दिशा दिली आहे.

Maharashtra TimesShubhangi Atre : ‘नवऱ्याचं दारूचं व्यसन वाढलं, स्वभाव चिडचिडा झाला’, लोकप्रिय अभिनेत्रीनं सांगितलं लग्नाच्या 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचं कारण
टीव्हीएफच्या गाजलेल्या कार्यक्रमांमध्ये पंचायत, गुल्लक, कोटा फॅक्टरी, अॅस्पिरंट्स, टीव्हीएफ पिचर्स, ये मेरी फॅमिली, क्युबिकल्स आणि पर्मनंट रूममेट्स यांचा समावेश आहे. टीव्हीएफच्या सात मूळ मालिकांना IMDb च्या ‘टॉप २५० टीव्ही शोज ऑफ ऑल टाइम’ यादीत स्थान मिळाले असून ही कामगिरी करणारे टीव्हीएफ हे एकमेव भारतीय स्टुडिओ आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत