Maherchi Sadi BTS : माहेरची साडी या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले. एका मुलाखतीत अलका कुबल यांनी सीनदरम्यानच्या आठवणी सांगितल्या.

अभिनेत्री अलका कुबल यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. त्या सुद्धा म्हणतात की मी पण हा जेव्हा सिनेमा पाहते तेव्हा खूप रडते. मला तेव्हा वाटतच नाही की त्या सिनेमात मीच होते. मी त्या सिनेमाचा कथानकात इतकी बुडून जाते की मला समजतच नाही , माझ्याही डोळ्यातून पाणी येतं. या सिनेमाच्या आठवणी सांगताना अलका कुबल एका मुलाखतीत म्हणाल्या की, या सिनेमातल्या एका सीन मध्ये मी तिरडीवर झोपणार होते. असला काहीसा सीन मी आयुष्यात पहिल्यांदाच करत होते. तेव्हा मला आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं की असा असा एक सीन आहे… तुला हे हे करावे लागेल… साधारण तीन चार तासात हा सीन संपेल. कारण मी त्यामध्ये तिरडीवर मृत्यू अवस्थेत असली तरीही इतरांचे डायलॉग होते.
Subhash Ghai On Salman Khan : त्या पार्टीत सलमानला दारू चढलेली, त्याने मला शिवीगाळ केली, सुभाष घईंनी सांगितली आठवण, पुढे दोघांमध्ये कसा झाला समेट?
अलका कुबल यांनी पुढे सांगितले की, त्यावेळी मला बांधलेलं, डोळ्यांवर ऊन येऊ नये म्हणून वरती छत्री धरलेली, मी फक्त झोपून होते, सगळ्यांकडे बघत होते छान एन्जॉय करत होते. पण नंतर त्या दिवशी नेमकं सगळ्या सूर्यप्रकाश जाऊन वातावरण ढगाळ झालं. त्यामुळे सगळी कंटिन्युटी होती ती बिघडली. मग मला आमचे कॅमेरामन म्हणाले की अलका सॉरी तुला उद्या पुन्हा एकदा तिरडीवर झोपावं लागेल. त्यावर मी त्यांना म्हणाले की चालेल मला काहीही प्रॉब्लेम नाही मी आजचा सीन मस्त एन्जॉय केला आहे. पण दुसऱ्या दिवशी मात्र सीन शूट करताना मला त्या तिरडीवर झोपायला होत नव्हतं कारण काल घातलेली सर्व फुलं अभीर गुलाल तसंच होतं. त्यावेळी मला वाटलं की मी माझंच मरण स्वतःच्या डोळ्यांनी बघते की काय… त्यावेळी मला त्या तिरडीवर झोपवेना. पण दुसऱ्या दिवशी तो सीन मी पटापट संपवला.
Chandrachur Singh : काकीने केला घात, तिला आत्याची साथ! अभिनेत्याचे गंभीर आरोप, आजोबांच्या खोट्या सह्या दाखवत हडपली 156 वर्ष जुनी हवेली, 7 जणांविरोधात FIR
याच मुलाखतीमध्ये अलका कुबल यांनी सांगितले की मला या सिनेमामुळे प्रेक्षकांचे प्रचंड अनुभव आले. मी त्यावेळी वेगवेगळ्या जत्रांमध्ये माझ्या फिल्म्स लावायचे. तिथे जायचे तेव्हा बायका अगदी डोळ्यात पाणी घेऊन यायच्या. मला हात लावण्यासाठी मला पाहण्यासाठी आतुर असायचा तेव्हा मला वाटायचं बापरे ईश्वराची काय खूप आहे आपल्यावर! पण या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट मी आमच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्याने देईन. सुरुवातीला बजेटमुळे मी हा सिनेमा स्वीकारत नव्हते पण पितांबर काळे यांनी मला नीट समजावलं की अलका ही संधी सोडू नकोस. बाहेर तुला भरपूर पैसे वगैरे मिळत असतील पण हा चान्स तू सोडू नये असं मला वाटतं. आणि आज खरोखर मी ते सगळं अनुभवते आहे. लोकमत फिल्मी ला दिलेल्या मुलाखती त्यांनी ही गोष्ट सांगितली.
माहेरची साडी या सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास हा सिनेमा 18 सप्टेंबर 1991 मध्ये रिलीज झाला होता. त्या काळात हा सिनेमा थिएटरमध्ये तब्बल 160 आठवडे चालला. अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी या सिनेमात खाष्ट सासूची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री अलका कुबल या त्यांच्या सूनबाई होत्या. अभिनेते अजिंक्य देव यांनी अलका कुबल यांच्या भावाची भूमिका साकारली होती.

