Headlines

आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारताला धक्का, हुकमी एक्का नीरज चोप्रा बाहेर; कारण आलं समोर


Neeraj Chopra News : भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा आशियाई स्पर्धेतून बाहेर झाला आहे. नीरज म्हणजे भारताचं पदक फिक्स अस समीकरण गेल्या काही स्पर्धांमध्ये दिसलं नाही. पण नेमकं काय कारण आहे की नीरज बाहेर पडला, जाणून घ्या.

Neeraj Chopra
Neeraj Chopra News(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारताला धक्का बसला आहे. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दुखापतीमुळे शनिवारी एशियाडमध्ये भाग न घेण्याचा निर्णय जाहीर केला. घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित मोसमातील कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नसल्याचे नीरजने जाहीर केले. यामुळे नीरजसाठी यंदाचा मोसमच संपुष्टात आला आहे.

उर्वरित मोसमावरच पाणी, याचा अर्थ ५ सप्टेंबरला ब्रुसेल्स येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम टण्यातही नीरज भाग घेऊ शकणार नाही. या स्पर्धेच्या लुसान टप्प्यानंतर नीरजने डायमंड लोग फायनलची पात्रता मिळवली होती. गेल्याच आठवड्यात डायमंड लीग मालिकेतील लुसान स्पर्धेत नीरजने मोसमातील सर्वोत्तम भालाफेक केली होती. त्या स्पर्धेच्यावेळी ही दुखापत न झाल्याचे नीरजने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितले.

Maharashtra TimesAsia Cup 2026 : आशिया कपमध्ये भारत वि. थायलंड आज पहिला सामना; किती वाजता आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या‘कठोर परिश्रम घेतल्यानंतर अखेर लय गवसत होती. लुसानमध्ये मोसमातील सर्वोत्तम कामगिरीही झाली, ज्याची मी चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत होतो. दुर्दैवाने काही वेळात सरावादरम्यानच माझ्या त्रोट्धाला दुखापत झाली. माझे डॉक्टर, सहायक वर्गातील सदस्य यांच्याशी चर्चा केल्यानंतर दुखापतीची गंभीरता बघून उर्वरित मोसमात न खेळण्याचा निर्णय झाला’, असे नीरजने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Maharashtra TimesImran Khan Pakistan : दाऊदचा व्याही कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडला! इम्रान खान यांची अवस्था पाहून अश्रू अनावर, पाकिस्तान सरकारकडे काय केली मागणी?
लय गवसत आहे, असे वाटत असतानाच दुखापतीचा पुन्हा खो बसल्याने, २८ वर्षीय नीरज निराश आहे. मात्र सध्या पूर्णपणे फिट होणे, हे मुख्य लक्ष्य असल्याचेही नीरजने सांगितले. ‘आता माझे लक्ष पूर्णपणे फिट होण्यावर आणि आधीपेक्षाही अधिक कणखर होऊन पुनरागमन करण्यावर आहे’, असा विश्वासही नीरजने व्यक्त केला.

Maharashtra TimesAnaya Bangar : अनाया बांगर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला भिडली, परवानगी नाकारण्याच्या मागणीला दिलं सडेतोड उत्तर, स्पष्टच बोलली…
‘चढउतार है जीवनाचा भाग असतात. मीदेखील ही परिस्थिती स्वीकारत पुढे वाटचाल सुरू केली आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार’, असेही नीरजने सांगितले. नीरजच्या अनुपस्थितीत रोहित यादव याच्याकडून पदकाची अपेक्षा असेल. तसेच नीरजाऐवजी बदली भालाफेकपटूचा विचारही सुरू आहे. राष्ट्रकुल ब्राँझपदक विजेत्या यशवीर सिंग याला संधी मिळू शकते.

लक्षवेधक

  • नीरजकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती, त्यामुळे त्याचे एशियाडला मुकणे हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे
  • टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या नीरजकडून यंदा साजेशी कामगिरी होत नव्हती
  • मात्र लुसानमधील चमकदार कामगिरीने सूर आणि लय पुन्हा मिळत असल्याचे संकेत नीरजकडून मिळत होते

दृष्टिक्षेप

  • नीरज चोप्रा म्हणजे भारताच्या पदकाची हमखास खात्रीच
  • गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये नीरज वरच्या क्रमांकावर
  • टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजने पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकले होते
  • २०२३मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा