Headlines

Akola Police Arrested Nandkishor Aware Over Gajanan Urban Cooperative Credit Bank


अकोल्यात एका पतपेढीत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी आज कडक कारवाई केली आहे.

Akola News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रियंका जाधव, अकोला : पतसंस्था म्हणजे पैसे जमा करण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण समजले जाते. पतसंस्थेत मोठा विश्वास ठेविदारांचा असतो. मात्र अकोल्यात एका पथसंस्थेने ठेवीदारांचा हा विश्वास तोडला आहे. अकोल्यातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 18 कोटी 76 लाख रुपयांच्या अपहार झालाच्या आरोपाखाली संस्थाचालक आणि त्याच्या मुलाच्या विरोधात कारवाई केली आहे. अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पतसंस्थेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी पिता-पुत्राला अटक करण्यात येत होती. पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर त्यांचे पुत्र मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर आवारे यांना अकोला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोल्यातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप गेल्या काही महिन्यांपासून होत होता. पतसंस्थेने एप्रिल महिन्यापासून ठेवीदारांना पैसे परत देणे बंद केले होते. त्यामुळे हजारो ठेवीदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

२५ कोटींच्या ठेवी अडकल्याचा अंदाज

अखेर अनेक तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान पतसंस्थेत जवळपास 18 कोटी 76 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. तसेच संस्थेतील २५ कोटी रुपयांहून अधिक ठेवी अडकल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

या पतसंस्थेत नोकरदार, पेन्शनर, कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांसह सुमारे अडीच हजार ठेवीदारांचे पैसे गुंतले आहेत. ठेवीदारांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवीदारांचा पैसा इतरत्र गुंतवल्याचा आरोप केला जात आहे.

अनेक वेळा आंदोलन आणि तक्रारी करूनही ठेवी परत मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. अखेर पोलिसांनी कारवाई करत अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

पोलीस काय म्हणाले?

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. “गजानन नागरी पतसंस्थेच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे जिल्हा लेखाधिकारी यांनी लेखा परिक्षण केलं. त्यामध्ये एकूण 18 कोटी 76 लाखांची त्यांनी अफरातफर केली, अशी माहिती दिली. त्यावरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह्याचा तपास आम्ही आर्थिक गुन्हे शाखा करत आहोत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नंदकिशोर आवारे हे बँकेचे मॅनेजर होते. त्यांना आम्ही अटक केलेली आहे. त्यांच्या वडिलांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या वडिलांना अटक करण्यात आलेली नाही. उर्वरित आरोपींना अटक करण्यात येईल. या प्रकरणी तपास सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांनी दिली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा