भाजपचे आमदार बंटी भांगडिया म्हणाले, की विकासकामांसाठी काँग्रेसचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असतात. आम्ही त्यांचीही कामे करतो. विविध कार्यक्रमांतून ते आमच्यासोबत दिसतात. त्यामुळे त्यांच्यासोबत छायाचित्रे आहेतच. परंतु, निवडणूक म्हणून काँग्रेसचा कोणताही नगरसेवक माझ्या संपर्कात नाहीत.
Devendra Fadnavis: साठेबाजांवर होणार कठोर कारवाई! इंधनाच्या कृत्रिम टंचाईवरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा, गृह विभागाला आदेश
काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या नगरसेवकांना पाच लाख रुपये देऊन उचलण्यात आले आहे. काँग्रेस जितके देईल त्याच्या दुप्पट देऊ, असे आमिष भाजपकडून दाखविले जात आहे.
‘..तर सर्व जागांबाबत चर्चा करावी’
नागपूर मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याच्या भाजपच्या भूमिकेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जर निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर केवळ एका जागेवर नाही, तर सर्वच्या सर्व जागांबाबत भाजपने चर्चा करावी. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीनही जिल्ह्यांतून उमेदवारांची नावे आली आहेत. पुढील एक-दोन दिवसांत महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार निश्चित केला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
‘राष्ट्रवादीच्या बैठकीत अजिबात वाद नाही, मी फक्त बोललो मुद्द्याचं बोला’, Chhagan Bhujbal यांचं स्पष्टीकरण
काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचे नगरसेवकन सांभाळता येत नाही, त्याला आम्ही काय करावे. सुट्या असल्याने नगरसेवक कुटुंबासोबत फिरायला गेले असतील. त्यांचा मोबाइल ‘नॉट रिचेबल’ असेल, त्याला आम्ही जबाबदार नाही. –बंटी भांगडिया, भाजपचे आमदार
आमच्या नगरसेवकांना पाच लाख रुपये देऊन उचलण्यात आले. भाजपकडून देण्यात आलेल्या आमिषाचे सर्व रेकॉर्ड्स आणि पुरावे आहेत. वेळ आल्यावर सगळे पुरावे जनतेसमोर मांडू. – विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते

