Headlines

Akola Nitesh Janjal kills Gay Partner Amol Pawar in betrayal Crime News; तीन वर्षांपासून समलिंगी संबंध, ‘त्या’ रात्रीच्या घटनेने नात्याला तडा, नितेशने अमोलचा जीव घेतला, महाराष्ट्र हादरला


Crime News : गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. कारण नितेशला संशय होता की अमोलचे इतर कोणाशी तरी शरीरसंबंध आहेत.

Akola Gay Crime Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अकोला : तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोन युवकांपैकी एकाने दुसऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यातून समोर आला आहे. अविश्वास आणि नात्यात फसवणूक केल्याच्या संशयातून झालेल्या वादामधून ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील संजय नगर येथे घडली. अमोल दिगंबर पवार आणि नितेश अरुण जंजाळ या दोघांमध्ये समलिंगी संबंध सुरु होते. गेल्या तीन वर्षांपासून ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते.

सुरुवातीला दोघांचंही नातं प्रेमाने भरलेलं होते. एकत्र राहत असताना घरातील कामांची वाटणी करत होते आणि एकमेकांना साथही देत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. नितेशला संशय होता की अमोलचे इतर कोणाशी तरी शरीरसंबंध आहेत.

या संशयामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. हे वाद वाढत गेले आणि अखेर एका घटनेने गंभीर वळण घेतले. घटनेच्या रात्री नितेश अमोलसाठी बाहेरुन जेवण घेऊन आला होता. मात्र जेवणानंतर त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. रागाच्या भरात नितेशने अमोलवर लाठी आणि लाकडी दांड्याने हल्ला केला. या हल्ल्यात अमोलच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात अमोलचा जागीच मृत्यू झाला.

अमोलचा पडून मृत्यू, नितेशचा बनाव

दुसऱ्या दिवशी सकाळी नितेश घरातून बाहेर येऊन ओरडू लागला की अमोल पडला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता अमोलच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या.
Maharashtra TimesCrime News : पळ तुझे बाबा आले; मित्रासोबत बंद फ्लॅटमध्ये असताना वडिलांची चाहूल, जोडप्याची धांदल, तरुणी आठव्या मजल्यावरुन पडली
प्राथमिक तपासात डोक्यावर आणि चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी नितेशकडे चौकशी सुरु केली, मात्र तो आधी उडवाउडवीची उत्तरं देत होता. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी अमोलचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला.
Maharashtra TimesVasai Crime : विकीsss काय होतंय? वसईच्या लॉजमध्ये विवाहित प्रियकराचा मृत्यू, प्रेयसी घाबरली, CCTV फूटेज तपासलं, ‘ते’ ड्रिंक जीवावर बेतलं?
हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अमोलचा साथीदार नितेशला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपी नितेशकडे अधिक चौकशी करत आहेत.

Who gets Muslim votes in Mumbai? : मुंबईतील मुस्लीम मतं कुणाला? बांद्रामधील नागरिकांचा स्पष्ट कौल!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल आणि नितेश हे दोघे मोठी उमरी परिसरातील संजय नगरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांचे संबंध समलैंगिक होते. मात्र नितेशला अमोलच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने भांडणानंतर रागाच्या भरात अमोलचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा