Headlines

ADR Report on 31 Chief Ministers in India Maharashtra CM Devendra Fadnavis Property; देशातील 31 मुख्यमंत्र्यांची संपत्ती जाहीर, डीके शिवकुमार 1413 कोटींचे धनी, देवेंद्र फडणवीस यांचा शेती व्यवसाय, मालमत्ता 13 कोटी


Chief Ministers Asset : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis DK Shivkumar Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्याचे सर्वोच्च राजकीय नेतृत्व असलेले मुख्यमंत्रिपद भूषवण्याची संधी महिलांना देण्याबाबत पुरोगामी महाराष्ट्रासह देशभरात उदासीनता आहे. सध्या देशातील ३१ मुख्यमंत्र्यांपैकी केवळ केंद्रशासित दिल्लीच्या रेखा गुप्ता या एकमेव महिला आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील मुख्यमंत्र्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांच्या विश्लेषणातून तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय यांच्यासह चार मुख्यमंत्री अब्जाधीश असल्याचे एका ताज्या अहवालातून समोर आले असून, यातील तीन मुख्यमंत्री दाक्षिणात्य आहेत.

प्रतिज्ञापत्रांच्या आधारे अहवाल

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. महिलांना मातृशक्ती असे म्हणून व त्यांच्यावर निवडणुका आल्या, की रोख पैशांचा वर्षाव करून राजकारणात अधिक संधी देण्याची भूमिका अनेक पक्ष मांडतात. प्रत्यक्षात मुख्यमंत्रिसाठी महिलांना संधी देण्याची तयारी फारच कमी दिसते. त्यामुळे राज्यांच्या सर्वोच्च नेतृत्वात महिलांचे प्रतिनिधित्व अत्यल्पच राहिल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालात मुख्यमंत्र्यांची मालमत्ता, उत्पन्न, दायित्वे, गुन्हेगारी पार्श्वभूमी, शिक्षण, वय आणि लिंग या विविध बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे.
Maharashtra TimesNirmala Sitharaman : महेश काळेंना हजारो वर्षांचं आयुष्य लाभो, अभंग ऐकून मंत्रमुग्ध, निर्मला सीतारमन वाकून पाया पडल्या
देशातील ३१ पैकी ११ मुख्यमंत्र्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, लाचखोरी आणि गुन्हेगारी धमकीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी दोन मुख्यमंत्र्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

फडणवीस शेतकरी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अडकलेले नाहीत. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात शेती हा आपला व्यवसाय असल्याचे नमूद केले असून, १३.२७ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता जाहीर केली आहे. फडणवीस यांच्यावर ६२ लाखांचे देणे आहे.

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीत कर्ज आणि यादीचा घोळ, ‘हेअरकट’ प्रकरण काय?

अनुक्रमे सर्वाधिक श्रीमंत चार मुख्यमंत्री

डी. के. शिवकुमार (कर्नाटक)
१४१३ कोटी रुपये

चंद्राबाबू नायडू (आंध्र प्रदेश)
९३१.८४ कोटी रुपये

विजय (तमिळनाडू)
६४८.८६ कोटी रुपये

पेमा खांडू (अरुणाचल प्रदेश)
३३२.५७ कोटी रुपये
Maharashtra TimesCrime News : पती ऑस्ट्रेलियात, बोलायलाही वेळ नसतो; सुनेने दोन वर्ष कुटुंबाला गंडवलं, शेवटी ‘दृश्यम’ स्टाईल उलगडा, 12 फूट खोदकाम
मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता
११८.०७ कोटी रुपये

देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र)
१३.२७

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा