Headlines

Kolhapur Shirgaon Former Female Sarpanch Surekha Nyare Case Killed Claim Over Money Dispute not Immoral Relationship; पंढरपूरला विठ्ठल दर्शनाचा बहाणा, गोठ्यात निर्घृणपणे संपवलं, अनैतिक संबंध नव्हे, तर वेगळंच कारण?; माजी सरपंचबाईंच्या प्रकरणात नवा ट्विस्ट


Kolhapur Crime News : कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केलेल्या या आरोपांमुळे सुरेखा न्यारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मात्र, पोलीस तपासानंतरच हत्येचं खरं कारण पुढे येणार आहे.

Kolhapur Crime News
माजी सरपंच सुरेखा न्यारे प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा शिवाजी न्यारे (वय 50) यांच्या निर्घृण खुनाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय 40) याला पोलिसांनी अटक केली असली, तरी या गुन्ह्यामागील मूळ हेतू आणि सहभागाबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीतून सुरुवातीला हे प्रकरण अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले होते. मात्र मृताच्या कुटुंबीयांनी यामागे मोठा आर्थिक व्यवहार आणि पूर्वनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

भाच्याच्या धाडसामुळे उघडकीस आले कृत्य

रविवारी 26 जुलै रोजी संशयित प्रकाश पाटील याने सुरेखा न्यारे यांना पंढरपूरला विठ्ठल दर्शनाच्या बहाण्याने आपल्या कारमधून गावाबाहेरील लिंडोरी येथील गोठ्यात नेले होते. तेथे वैरण घालण्याचे निमित्त करून त्यांचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गाडीत ठेवून कोल्हापूरहून सुमारे 350 किमी प्रवास करत भिवंडीमार्गे मुंबईच्या समुद्रात फेकण्याचा त्याने कट रचला. मात्र, भिवंडीतील कशेळी येथे भाचा संदेश मोरे याच्याकडे मदत मागितल्यानंतर त्याने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली आणि भिवंडी पोलिसांनी प्रकाश पाटीलला अटक करून हा खळबळजनक गुन्हा उघडकीस आणला.
Maharashtra TimesMangesh Jagtap : ‘लग्न ठरलेलं, महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बुक, शारीरिक संबंध’; पुणे जिल्हा परिषद सदस्याच्या प्रेमप्रकरणात मोठी अपडेट

कुटुंबीयांचे गंभीर आरोप; दागिने आणि पैशांचा वाद?

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्येचे कारण अनैतिक संबंध आणि विवाहासाठी लावलेला तगादा असे समोर आले असले तरी, मृत माजी सरपंच सुरेखा यांचा मुलगा साहिल न्यारे याने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात वेगळाच दावा केला आहे. प्रकाश पाटील याने वाहन खरेदीसाठी सुरेखा यांच्याकडून 8 तोळे सोन्याचे दागिने आणि 3 लाख रुपयांची रोकड उसने घेतली होती. ही रक्कम आणि दागिने परत मागितल्यानेच त्यांचा नियोजनबद्ध पद्धतीने खून करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

संशयिताच्या संपूर्ण कुटुंबाची चौकशी करण्याची मागणी

न्यारे यांच्या कुटुंबीयांनी हा खून केवळ एका व्यक्तीचे काम नसून त्यात प्रकाशची पत्नी, आई, अल्पवयीन मुलगा आणि भाचा संदेश मोरे यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनेच्या दिवशी आरोपीच्या पत्नीने सुरेखा यांना वारंवार फोन करून शेतात बोलावल्याचे आणि त्यानंतर कुटुंबीयांची दिशाभूल केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सर्व संशयितांचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे.
Maharashtra TimesRain Alert: पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; विदर्भाला झोडपणार, IMD चा ताजा अंदाज

पोलीसांचे कडक कारवाईचे आश्वासन

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. दरम्यान, सुरेखा न्यारे यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या खून प्रकरणामुळे शाहूवाडी तालुक्यात दहशतीचे वातावरण असून, पोलीस आर्थिक व्यवहाराच्या बाजूने तपासाची चक्रे फिरवत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा