Headlines

Aaraya Ghare Celebrated Birthday At Cremation ;Aaraya Ghare : मी माझा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा केलेला, आर्या घारेने सांगितली बर्थेडेची आठवण


Aaraya Ghare Birthday In Cremation : अभिनेत्री आर्या घारेने नुकतीच दिलेल्या मुलाखतीत स्मशानात वाढदिवस साजरा केल्याची आठवण सांगितली.

aarya ghare
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
साधारण 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या देऊळ बंद या सिनेमात आर्या घारे हिने राघव शास्त्रीच्या मुलीची म्हणजेच सनाची बालभूमिका साकारली होती. आता आर्या बरीच मोठी झाली असून ती मालिका सिनेमांमध्ये काम करते. आर्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या एका वाढदिवसाची आठवण सांगितली. जो तिने स्मशाणभूमीत साजरा केला होता.

आर्या घारे म्हणाली की, मी माझा बर्थडे स्मशानभूमी मध्ये सेलिब्रेट केला होता. माझा वाढदिवस 9 ऑगस्टला असतो. 6-7 ऑगस्टला मी एक आर्टिकल वाचलं होतं ज्यात नागपूर की नाशिक मध्ये पाच वर्षाच्या मुलीचा जीव गेला कारण तिचे आई-बाबा आणि मावशीला वाटलेलं की तिच्या अंगात भूत आहे. त्यामुळे त्यांनी त्या लहान मुलीला इतकं मारलं की त्यांच्या मते मारल्यावर ते भूत तिला सोडून जाईल… पण त्या मुलींने आपला जीवच सोडला. मी ते आर्टिकल वाचलं आणि माझं असं झालं की हे काय चालू आहे. कुठे चाललोय आपण… ठीक आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा गोष्टी असतात पण आपण त्याचा एवढा बाऊ नाही केला पाहिजे.

Maharashtra TimesAarya Ghare : देऊळ बंदनंतर डोक्यात गेली हवा, आईने व्हॅनिटीत नेऊन दिलेला चोप, आर्या घारेने सांगितली आठवण
तेव्हा मी माझ्या मम्माला म्हणाले की, मला मला स्मशान भूमीमध्ये माझा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. यावर ती मला म्हणाली नाही…! तू वेडी आहेस का? तू पागल आहेस का , बावळट आहेस का…. ती काही ऐकायला तयार नव्हती त्यामुळे मी एक पोस्ट बनवली आणि 8 ऑगस्टला माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर ती अपलोड केली की मी उद्या स्मशानभूमीमध्ये माझा वाढदिवस साजरा करत आहे. जर तुम्ही मला सपोर्ट करत असाल तर या… ती पोस्ट माझ्या आईने पण बघितली त्यानंतर ती मला खूप ओरडली पण मी तिला म्हटलं की आता पोस्ट मी टाकली त्यामुळे मला तिथे जावंच लागेल आणि माझा वाढदिवस साजरा करावाच लागेल. मग आई पण म्हणाली ठीक आहे तू आता टाकली असणार मग कर तिथे सेलिब्रेट मी आहे तुझ्यासोबत.

मग दुसऱ्या दिवशी मी भोसरी येथे स्मशानभूमी आहे तिथे मी माझा बर्थडे सेलिब्रेट केला. त्या वाढदिवसाला माझ्या नातेवाईकांपेक्षा पत्रकार लोक जास्त होते. केवळ मराठी हिंदीच नव्हे तर साउथ कडील चैनल मध्ये सुद्धा ती न्यूज लावली होती.
Maharashtra TimesAdinath And Urmila Kothare Divorce : चर्चा खऱ्या ठरल्या; मराठी सिनेइंडस्ट्रीतील स्टार कपल आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांचा घटस्फोट
असं म्हणतात की स्मशानभूमीत निगेटिव्ह एनर्जी असते. आपण कोणाच्या मयताला जरी गेलो तरी घरी येऊन अंघोळ करतो कारण ती निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये असू नये. पण मला कळत नाही की तिथे का निगेटिव्ह एनर्जी असेल? आणि जर असली तरीही आपल्याला तिथेच मुक्ती का मिळते? स्मशानभूमीत तुम्ही श्रीमंत आहात गरीब आहात, उंच की बुटके आहात हे काहीच विचारत नाही. अंतिम सत्य तेच आहे.. काहीही झालं तरी शेवटी तुम्हाला तिथे जायचं आहे. तुम्हाला जर तिथे मुक्ती भेटत असेल तर ते ठिकाण निगेटिव्ह कसं? एक भारतातील तरुणी म्हणून पुढे येऊन कोणीतरी बोललं पाहिजे होतं की श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नको म्हणून मी हे केलं. मला या गोष्टीची भयंकर चीड आहे की कोणीही अंधश्रद्धा ठेवू नये. इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीती आर्याने या गोष्टी सांगितल्या.

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

आर्याने पुढे सांगितलं की या गोष्टीने मी खूप ट्रोल झाले होते. कमेंट मध्ये काहींनी लिहिलेले की लग्न सुद्धा स्मशानातच कर वगैरे… पण मी आधी म्हटल्याप्रमाणे मी सगळ्यांच्या मताचा आदर करते पण मला हे करायचं होतं… कदाचित मला या मार्गानेच तुमच्यापर्यंत पोहोचता आलं असतं त्यामुळे मी स्मशानात बर्थडे केला. तो एकच बर्थडे मी तिथे केलेला पण एरव्ही मी कधीच माझा बर्थडे पार्टी सारखा सेलिब्रेट करत नाही. माझ्या जास्त फ्रेंड्स नाहीत. नेहमी माझा बर्थडे गोशाला, अनाथाश्रम, अंध व्यक्तींसोबत सेलिब्रेट केले आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा