#shivsenaschearing #rajendrasinghranacase #devdattakamat #uddhavthackeray #eknathshindeशिवसेनेतील फुट, आमदारांची अपात्रता आणि पक्षचिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत उद्धव ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी ‘राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य’ या 2007 च्या महत्त्वाच्या निकालाचा दाखला सुप्रीम कोर्टात दिला. जेव्हा आमदार फुटतात तेव्हा विधानसभा अध्यक्षांचे अधिकार किती असतात? अध्यक्ष अपात्रतेच्या निर्णयावर वेळकाढूपणा करू शकतात का? आणि न्यायालय अशा वेळी हस्तक्षेप करू शकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत २००७ च्या ‘राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य’ ऐतिहासिक खटल्यात! या एका केसने भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलला, ‘पक्षंतरबंदी कायद्या’ला नवी दिशा दिली. या खटल्याचा आधार घेत एकनाथ शिंदे यांचे आमदार सर्वोच्च न्यायालयानं अपात्र करावे अशी मागणी युक्तिवादादरम्यान देवदत्त कामत यांनी केली. या निकालाचा संदर्भ समजून घेतल्याशिवाय उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद नेमका काय आहे, हे पूर्णपणे समजत नाही आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य प्रकरणाची पार्श्वभूमी, कायदेशीर पेच, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आणि त्याचे ठाकरेंच्या केसशी असलेला संबंध समजून घेणार आहोत…