Headlines

Ballarshal Mumbai Nandigram Express Unauthorized Decoration First AC Coach for Honeymoon Action Against Decorator; हनिमूनसाठी रेल्वेच्या फर्स्ट AC कोचमध्ये अनधिकृत सजावट, घटनेनंतर रेल्वेचं कठोर पाऊल; ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं होतं?


Chhatrapati Sambhajinagar News : ६ जुलै रोजी ट्रेन क्रमांक ११०२ नंदीग्राम एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने आपला फर्स्ट एसी कूप डबा सजवण्यासाठी ऑनलाईन एका डेकोरेटरला खासगीरित्या नियुक्त केले होते. त्या डेकोरेटरने डब्याची सजावट केली. दरम्यान, डेकोरेटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nandigram Express First AC Coach Honeymoon
जालना नंदिग्राम एक्स्प्रेस हनिमून सजावट प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : रेल्वे क्रमांक ११००२ बल्लारशाह-मुंबई नांदिग्राम एक्स्प्रेसच्या प्रथम वातानुकूलित (फर्स्ट एसी) डब्यात जालना येथील एका खासगी डेकोरेटरने अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या घटनेची रेल्वे प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे.

वातानुकूलित डब्यात अनधिकृत प्रवेश

सहा जुलै रोजी संबंधित डेकोरेटरने जालना स्थानकावरून गाडीत प्रवेश करून प्रथम वातानुकूलित कूपेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सजावट केली. आरक्षित प्रथम वातानुकूलित डब्यात झालेला हा अनधिकृत प्रवेश हा रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर प्रकार आहे. अशा डब्यांमध्ये केवळ अधिकृत प्रवासी आणि रेल्वेचे अधिकृत कर्मचारी यांनाच प्रवेशाची परवानगी असते. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीचा प्रवेश प्रवाशांच्या सुरक्षिततेस व सुरक्षेला बाधा पोहोचवणारा असून रेल्वे प्रशासन अशा प्रकारांना अत्यंत गांभीर्याने पाहते.
Maharashtra TimesAshwini Bhide: अश्विनी भिडेंनी नाकारलं, पण रिपोर्टमध्ये तेच सत्य समोर आलं! मुंबईत झाड कोसळून झालेल्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड

शिस्तभंगाची कारवाई

संबंधित तिकीट तपासणी कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे हा अनधिकृत प्रवेश झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने त्यास पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. घटनेतील जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसेच प्रक्रियेमधील त्रुटींची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी अहवालाच्या आधारे दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर नियमानुसार योग्य शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. याशिवाय, संबंधित जालना येथील डेकोरेटरविरुद्ध रेल्वे कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार रेल्वे गाडीत अनधिकृत प्रवेश, वैध तिकिटाशिवाय प्रवास आणि रेल्वे परिसरात अनधिकृत प्रवेश (अतिक्रमण) असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

नियमांचे उल्लंघन टाळावे

प्रवाशांची सुरक्षितता, सुरक्षा आणि आराम सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असून, रेल्वेचे नियम व कार्यपद्धती यांची कठोर अंमलबजावणी सातत्याने केली जाईल. नियमांचे कोणतेही उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
Maharashtra TimesPune News: दीड वर्षांपूर्वी लग्न, बायकोला तो मेसेज केला अन् दुसऱ्याच क्षणाला सगळं संपलं; जेवत्या ताटावरच भावेशवर काळाचा घाला!

संबंधितांवर कारवाई

रेल्वे प्रशासन देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोणत्याही खासगी व्यक्तीला किंवा व्यावसायिक सेवा पुरवठादाराला आवश्यक परवानगीशिवाय रेल्वेत किंवा आरक्षित डब्यांमध्ये प्रवेश करण्यास परवानगी नाही. प्रवाशांनी गाडीत सजावट किंवा इतर कोणत्याही सेवांसाठी अशा अनधिकृत व्यक्तींची नियुक्ती करू नये. असे प्रकार रेल्वे नियमांचे उल्लंघन असून, संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा