Headlines

Kalyan Water Cut: घोटभर पाण्यासाठी कासावीस; कल्याणमध्ये 96 तास पाणीपुरवठा बंद, टँकरचालकांकडून लूट


Kalyan Water Cut: टँकरचालकांनी अवाच्या सवा दर आकारत नागरिकांची लूट चालवली आहे. त्यामुळे घोटभर पाणी मिळवण्यासाठी नागरिक कासावीस होत आहेत.

thane water cut
ठाणे पाणीपुरवठा बंद(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: मुसळधार पावसामुळे पम्पिंग स्टेशनमध्ये गाळ साचून रविवारी रात्री कल्याणचा पाणीपुरवठा बंद झाला. तर दुसऱ्या दिवशी १,३२१ मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहरावर पाणी संकट कोसळले. फुटलेल्या जलवाहिनीची मागील ७२ तासांपासून दुरुस्ती सुरू असून शहरातील नागरिकांची पाण्यावाचून अक्षरश: तडफड होत आहे. पिण्याचे पाणी खरेदी करण्यासाठी दुकानात झुंबड उडाली आहे.

एकीकडे सलग ७ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले असताना कल्याण डोंबिवली शहराला मात्र घोटभर पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेच्या मोहिली १०० एम एलडी आणि मोहने १४४ एमएलडी या दोन्ही पम्पिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले. गाळाचा उपसा होईपर्यंत हे दोन्ही प्लांट बारा तास बंद ठेवावे लागले. त्यानंतर मोहिलीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे कल्याणातील योगीधाम, रामबाग यासह डोंबिवली शहराला पाणी उपलब्ध झाले असले, तरी कल्याण पूर्व पश्चिम शहर मात्र तहानेने व्याकूळ झाले.

Maharashtra TimesThane News : आक्राळविक्राळ पाऊस अन् जीवघेणी हवा, वृक्ष कोसळले, जखमी पांडुरंगांची झुंज अपयशी, भुवड कुटुंबावर दु:खाचा डोंगर
मोहने पम्पिंग स्टेशन कडून बारावे प्लांटकडे जाणारी मुख्य जलवाहिनी नदी पात्रात फुटली. सलग दोन दिवस नदी पात्रातील पाण्याच्या वेगवान प्रवाहांमुळे दुरुस्तीत अडथळे निर्माण झाले. केडीएमसीच्या जलवाहिनी लगत असलेल्या स्टेमच्या १८५० मिमी व्यासाच्या नव्या जलवाहिनीला केडीएमसीची जलवाहिनी कापून जोडण्यात आली. हे काम मागील दोन दिवसांपासून अहोरात्र सुरू होते. तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जलवाहिनी दुरुस्तीसाठी ठाण मांडून बसले होते.

वापरासाठी लागणारे पाणी मिळविण्यासाठी टँकरचा आधार घेतला जात असला, तरी टँकरचालकांनी दोन ते अडीच हजारात बोअरिंग किंवा विहिरीच्या पाण्याचा टँकर देत नागरिकांची लूट चालवली आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी पावसाच्या पाण्याचा वापर केला.

Maharashtra TimesThane Accident: घोडबंदर रोडवर भीषण दुर्घटना! रिक्षावर टँकर कोसळून चालकासह दोघांचा करुण अंत; एक गंभीर
सातत्याने फोन
घोटभर तरी स्वच्छ पाणी मिळणार आहे का? अशी विचारणा करण्यासाठी लोकप्रतिनिधी, पालिका कर्मचारी आणि पत्रकारांना नागरिक सतत फोन करत होते. महापौर हर्षाली थवील यांच्यासहनगरसेविका हेमलता पवार, नगरसेवक महेश गायकवाड, मधुर म्हात्रे, माजी नगरसेवक रवी पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करत नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले.

पाणी संपल्याचे फलक
नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरद्वारेदेखील बारावे प्लांटवरूनच पुरवले जात असून, हा प्लांटच बंद असल्याने पिण्याचे पाणी मिळण्याचे स्त्रोत बंद झाले. यामुळे नागरिकांना विकतच्या पाण्याच्या बाटल्यांचा आधार घ्यावा लागला. बाटल्या खरेदीसाठी कालपासून दुकानात झुंबड उडाली आहे. चौथ्या दिवशी अनेक दुकानांत पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचे चक्क बोर्ड लावण्यात आले आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा