Headlines

Live Your Life By Your Goals, Not Others Expectations: Balraj Sanghai Column


  • Marathi News
  • Opinion
  • Live Your Life By Your Goals, Not Others Expectations: Balraj Sanghai Column

बलराज संघई1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

जगामध्ये ‘ स्व ‘ सोडून ‘ लोकं ‘ नावाचा एक समुदाय असतो. या समुदायाला काय वाटेल याचीच चिंता माणूस सतत करत असतो. अनेक जण या लोकांच्या कल्पनेनुसार जगतात. मी स्वतःला वाटतं तसा राहिलो तर लोक काय म्हणतील? मी माझ्या इच्छेनुसार जगलो तर लोकांना काय वाटेल? मी मनासारखं वागलो तर लोक काय विचार करतील? असा विचार करूनच आजकाल बहुतांशी माणसं लोकांच्या अपेक्षानुसार जगत आहेत.

याचाच अर्थ जीवन आपण जगत आहोत परंतु त्या जगण्याला काहीच अर्थ नाही. मी जे जीवन जगतो आहे तो मी नाही,आणि मी जगलेले जीवन माझे नाही. म्हणूनच या अशा जगण्याला अर्थ नाही. जे जीवन आपल्या स्वतःच्या संकल्पनेनुसार जगले, आपल्या विचार ध्येय आणि उद्देशाच्या निश्चितीनुसार जगले, आपल्याला वाटेल तसे मनाप्रमाणे जगत राहिले, तर ते जीवन आपले म्हणावे.

आता लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्यावा. आपण आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण कराव्यात. आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी आणि मतानुसार आपल्या जीवनाची आखणी करावी. आणि त्यानुसार पुढे चालावे. लोकही पुढे जात आहेत. कोणीही थांबलेले नाही. जग चाललेले आहे. घड्याळाचे काटे थांबलेली नाहीत. आलेला क्षण मागे जात आहे. पुढचा क्षण वर्तमान होत आहे. हातातून निसटलेला क्षण भूतकाळात जात आहे. यामध्ये लोकांच्या इच्छा अपेक्षा कुठे येतात ? आणि त्यांना कुठवर महत्त्व द्यायचं ? हे आपण ठरवायचं.

वाच्यता न करता स्वतःला बदला.लोकं ईर्षेने तळमळतील. जगाला मोठे उत्तर शब्दांनी नव्हे तर परिवर्तनाने द्यायचे असते. तुम्ही दूर जात नाहीत तो पर्यंत त्यांना तुमची किंमत कळत नाही. लोकांना रडून समजावून सांगू नका.ही जाणीव होऊ द्या की त्यांनी काय गमावले आहे.

स्वार्थ असेल तिथे आपलेपणा शोधु नये. फक्त उपयोग पाहिला जातो तिथे प्रेम शोधु नये. उणीव आपल्या निवडीमध्ये असते. लोकं जसे असतात तसेच असतात. आता वेळ आली आहे स्वतःकडे परतण्याची. आत्मकेंद्रित होण्याची.

वर्तमानातच जगून निघावे. निसटलेले क्षण परत येत नाहीत, याचा चांगला अनुभव प्रत्येकालाच आलेला आहे. म्हणून आयुष्याचा उद्देश निश्चित करावा. आपल्या ध्येयपूर्ती कडे प्रामाणिकपणे, स्व-कष्टाने चालावे. रस्त्यात येणाऱ्यांची चिंता नको, कोणाचा विचारू नको, कोणाबद्दल मनात राग,द्वेष नको. आत्मसन्मान असावा, पण अहंकार नको. असंच आपल्या उद्देशाला धरून, प्रामाणिकपणे, नैतिकतेने, धैर्याने, आत्म सन्मानानं उद्देशाकडे ध्येयाकडे जाता येतं. फक्त आपण आत्मकेंद्रीत असावे.

इतरांचा सन्मान आदर असावा परंतु त्यांच्या कल्पनेचा आपल्या जीवनात विचार नको. आपल्या अपेक्षा आणि कल्पनेनुसार लोक जगत आहेत का? हे आपण पाहतच नाहीत. मात्र लोकांना काय वाटते?आपण कसे असावे? म्हणून लोकांना त्यांच्या नजरेत चांगले दिसावे म्हणून आपण एक अभिनयाचे जीवन जगत असतो. आपले स्वतःचे जीवन स्वतःच्या विचाराने आणि आपण निश्चित केलेल्या ध्येयाकरिता जगावे असेच आज या ठिकाणी व्यक्त व्हावे वाटते.

(संपर्क- 9420015108)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत