Headlines

नवी मुंबईत मेट्रोचं ‘मेगा नेटवर्क’! दोन नव्या मार्गिकांमुळे प्रवास सुखद होणार; कल्याणपर्यंत पोहोचणं शक्य| Maharas


Navi Mumbai Metro 2: नवी मुंबई शहरात अनेक वर्षांपासून धावणाऱ्या मेट्रो १च्या विस्तारासह एका नव्या मार्गिकेला मंजुरी मिळाली आहे. मेट्रो- १ ए आणि २ शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलणार आहे.

मेट्रो- १ ए आणि २
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबईच्या वाहतूक पायाभूत सुविधांना मोठी चालना देणाऱ्या मेट्रो- १ ए आणि २ विकसित करण्याच्या सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या नवीन मार्गिकांमुळे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे. सुमारे ५,५७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे बांधकाम २०२७-२८ मध्ये सुरू होणार आहे.

नोव्हेंबर २०२३मध्ये नवी मुंबई मेट्रो- १ यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर, सिडकोने पुढील विस्ताराचा सविस्तर प्रकल्प अहवाल सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला होता. त्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. २०३१-३२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे कल्याण, तळोजा आणि आसपासच्या नागरिकांनाही विमानतळापर्यंत सुलभ व जलद कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

Maharashtra TimesAqua Lineवर मिळणार ‘मोबाइल नेटवर्क’! भुयारी मेट्रोच्या 16 स्थानकांत सेवा सुरू; उर्वरित स्थानकांतही काम प्रगतिपथावर

भविष्याभिमुख जागतिक शहर !

‘नवी मुंबई मेट्रो – १ ए आणि २ ला मिळालेली मंजुरी हा नवी मुंबईत जागतिक दर्जाची, एकात्मिक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. या मार्गिकांमुळे निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि विमानतळ परिसरातील संपर्क अधिक सक्षम होईल. हा प्रकल्प विकासाला चालना देण्यासोबतच प्रवाशांचा प्रवास सुकर करेल आणि नवी मुंबईला जागतिक शहर म्हणून सक्षम करेल,असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला.

… असे असेल नवीन मेट्रो मार्गिकांचे जाळे

मेट्रो – १ ए (सीबीडी बेलापूर ते सागर संगम): हा ३.२ किमी लांबीचा उन्नत मार्ग असून, यात दोन स्थानकांचा समावेश असेल. या मार्गाला प्रस्तावित गोल्ड लाइन (मेट्रो लाइन-८) शी जोडण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबईच्या पश्चिम भागातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास अखंड आणि सुलभ होईल.

मेट्रो- २ (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-४) : हा १४.७ किमी लांबीचा मार्ग ११ स्थानकांसह विकसित केला जाईल. विमानतळ परिसरातील वेगाने विकसित होणारे क्षेत्र आणि एमआयडीसी भागाला जोडण्यास महत्त्वाचे ठरेल.

विशेष जोडणी: या मार्गाची तळोजा येथील अमनदूत स्थानकावर, एमएमआरडीएतर्फे विकसित केल्या जाणाऱ्या कल्याण-तळोजा मेट्रो लाइन- १२ शी आंतरजोडणी प्रस्तावित आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या पूर्वेकडील भागांनाही या मेट्रो नेटवर्कचा थेट लाभ मिळेल.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा