Alibaug Navgaon 42 Year Old Woman Killed Due to Extramarital Affair; पतीपासून लपून विवाहबाह्य संबंध, घरी नवऱ्यासोबत भांडण अन् बाहेर प्रेमातच दोघांमध्ये राडा; प्रियकरानेच प्रेयसीला संपवलं
Alibaug Navgaon 42 Year Old Woman Killed Due to Extramarital Affair; पतीपासून लपून विवाहबाह्य संबंध, घरी नवऱ्यासोबत भांडण अन् बाहेर प्रेमातच दोघांमध्ये राडा; प्रियकरानेच प्रेयसीला संपवलं
Alibaug Woman Killed Over Love Affair : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रायगडमधील अलिबाग तालुक्यात एक मोठी घटना उघडकीस आली आहे.
अलिबाग नवगाव विवाहबाह्य संबंध महिलेची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : अलिबाग तालुक्यातील नवगाव परिसरात विवाहबाह्य प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी संशयित प्रियकराला अटक केली असून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल गुरुवारी रोजी महिलेचं तिच्या पतीसोबत पुन्हा भांडण झाल्यानंतर ती आरोपीच्या घरी गेली होती. त्यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून तीव्र वाद झाला. या वादातून आरोपी निलेश घासे याने महिलेला मारहाण केली. त्यानंतर तिला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेनंतर अलिबाग सिव्हिल रुग्णालयात बॉडी आणण्यात आली होती. प्राथमिक चौकशीनंतर आणि अकस्मात मृत्यू नोंदीवरील तपासातून खुनाचा संशय बळावल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मयत महिलेचा मुलगा जय जगदीश पाटील याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. Pune News: प्रेमाचा नाद बेक्कार! पुण्यात एकाच तरुणीवरून दोन मित्रांमध्ये वाद; २३ वर्षीय हर्षला मित्रानेच संपवलं
प्रेमसंबंधातील तणाव आणि सततचे वाद
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकानेही भेट देऊन आवश्यक पुरावे संकलित केले. पोलिस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपी निलेश घासे याला अटक केली असून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचा पूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र, प्रेमसंबंधातील तणाव आणि सततचे वाद अखेर एका महिलेच्या जीवावर बेतल्यानं अलिबाग परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. पोलिस तपासातून या प्रकरणातील अधिक तपशील पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा