Zeenat Aman On Marriage With Mazhar Khan : झीनत अमान यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – झीनत अमान यांनी १९८५ मध्ये अभिनेता मजहर खान यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुलं आहेत. मजहर खान यांच्यासोबतच्या लग्नानंतर झीनत अमान यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. लग्नानंतर मजहर खान आपली फसवणूक करत असल्याचं झीनत अमान यांना समजलेलं. मात्र, त्यांनी घटस्फोट घेतला नाही. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत झीनत अमान यांनी त्यांच्या लग्नाबद्दल आणि बॉलिवूडमधील अफेअरबद्दल भाष्य केलं आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल काय म्हणाल्या झीनत अमान?
मुलाखतीदरम्यान झीनत अमान म्हणाल्या की, ‘मी खूप तरुण होते, त्यावेळेस मी काही निर्णय घेतले. त्या वयामध्ये मला जे योग्य वाटत होतं आणि जे मला हवं होतं, त्याआधारे मी निर्णय घेतले. त्यातील काही निर्णय योग्य ठरले, तर काही चुकीचे ठरले. वय हे तुम्हाला आयुष्याकडे पुन्हा मागे वळून बघण्याची संधी देतं. नेहमीच स्वतःला दोष देण्याची गरज नसते.’
Omkar Karve On Producer : ‘इंडस्ट्रीला लागलेली किड, तो नुसत्या शिव्या घालत नाही तर लाथाबुक्क्यांनी मारतो’, मराठी अभिनेत्याचे निर्मात्यावर गंभीर आरोप मजहर खान यांच्यासोबतच्या लग्नाबद्दल बोलताना झीनत अमान म्हणाल्या की, ‘जेव्हा मी मजहरशी लग्न केलं, तेव्हा मला आई होण्याची इच्छा होती. आपलं कुटुंब असावं आणि त्यासाठी मुलं असणं गरजेचं आहे, असं मला वाटायचं. त्यानुसार मी निर्णय घेतला. पण या नात्यानं मला प्रेम आणि स्वतःला गमावणं यामधील फरक शिकवला. या नात्यातून शेवटी मला समजलं की, स्वतःला उद्ध्वस्त करून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला वाचवू शकत नाही. मी त्याच्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मलाच स्वतःची मदत करावी लागेल, हे मला जाणवलं. तो माझ्या मुलांचा वडील आहे, त्यामुळे मला त्याच्याबद्दल काहीच अपमानास्पद बोलायचं नाही.’
Vandana Gupte Interview : हाताने रिक्षा उलटवली, मराठी मोहीम योग्यच, वंदना गुप्ते यांची बेधडक मुलाखत
‘नात्यामध्ये फक्त प्रेमच नाही, तर आदर असणंही महत्त्वाचं आहे. कधी कधी स्वतःसाठी आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी नात्यातून बाहेर पडणं हेसुद्धा स्वतःवर केलेलं प्रेम असतं. वैवाहिक नात्यामध्ये महिलांनाच परिस्थितीशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला जातो. समोरच्या व्यक्तीचं वागणं चांगलं समजायचं आणि स्वतःला होणारा त्रास मात्र किरकोळ समजायचा, असं शिकवलं जातं. आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला असतो. पण कधीकधी समोरच्याशी जुळवून घेताना आपण स्वतःलाच ओळखणं विसरून जातो.’ असंही झीनत अमान यांनी म्हटलं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा