सप्टेंबर 2025 मध्ये जीएसटी कौन्सिलची 56वी बैठक झाली होती. त्या बैठकीत जीएसटी दरामध्ये कपात करण्यात आली होती. तसेच टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आला होता. जीएसटीचे 4 स्लॅब कमी करून 2 मुख्य स्लॅब नेमण्यात आले होते. तसेच लाईफ इन्शुरन्सवर जीएसटी माफ करण्यात आली होती. भारतीय ब्रेडवरील जीएसटी शून्य करण्यात आली होती तसेच आरोग्य वीमावर आकरण्यात येणारी जीएसटीही माफ करण्यात आली होती. एकंदरीत, गेल्या बैठकीत जीएसटीच्या दरात कपात करून ग्राहकांच्या फायद्याचा विचार करण्यात आला होता.
यंदाच्या बैठकीचा अजेंडा काय असेल?
जीएसटी कौन्सिलच्या आगामी बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होणार? याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर नाही. दरम्यान, गेल्या वर्षी कपात करण्यात आलेल्या जीएसटी दराचा फायदा ग्राहकांना खरंच होत आहे का? या गोष्टींचा तपास तसेच यावर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर गेल्या निर्णयाचा ग्राहकांना पुरेपूर फायदा झाला असेल तर दर आणखीन शिथिल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे यंदाच्या बैठकीत मोबाइल स्मार्टफोनवर आकरण्यात येणाऱ्या जीएसटीसंदर्भातही चर्चा होऊ शकतात.
Grant Thorton India चे पार्टनर मनोज मिश्रा यांचे म्हणणे आहे की, “यंदा जीएसटीचे नियम अधिक स्पष्ट करण्यावर भर दिला जाऊ शकतो तसेच टॅक्स एडमीनिस्ट्रेशन अधिक पारदर्शन बनवण्याच्या हेतूने बैठकीत निर्णय घेतले जाऊ शकतात.”
वर्षभरात जीएसटीच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ
जुलै 2025 मध्ये जीएसटी कलेक्शन 1.83 लाख कोटी रुपये इतका झाला होता. तर जुलै 2026 मध्ये जीएसटीचे कलेक्शन 2.11 लाख कोटी इतके होते. एकंदरीत, गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात जीएसटीच्या कलेक्शनमध्ये 15.4 टक्क्यांची वाढ झाली होती.
Home Buying: फ्लॅटचा ताबा मिळाला तरी तुम्ही घरमालक नाही; मालमत्तेची कायदेशीर मालकी नक्की कशी ठरते? कागदपत्रांचा खेळ समजून घ्याफक्त कलेक्शन नाही तर रिफंडमध्येही झाली वाढ
जुलै 2026 मध्ये 29,968 कोटींचे जीएसटी रिफंड करण्यात आले. यंदा जीएसटी रिफंडमध्ये 13.1 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली.

