Headlines

US Visa Crisis : ६० दिवसांचा ग्रेस पीरियड रद्द होण्याच्या मार्गावर, H-1B व्हिसाधारकांसमोर नवं संकट – h 1b loses 60 day grace period as white house office appoves plan


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी अमेरिकेत नोकरी करत असेल किंवा H-1B व्हिसावर अमेरिकेत जाण्याचे स्वप्न पाहत असाल, तर व्हाईट हाऊसमधून आलेली ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाधारकांसाठी अत्यंत धक्कादायक पाऊल उचलले आहे. आता अमेरिकेता नोकरी गमावल्यानंतर तिथे नवीन काम शोधण्यासाठी मिळणारा ६० दिवसांचा सवलतीचा काळ म्हणजेच ‘ग्रेस पीरियड’ पूर्णपणे रद्द करण्याच्या प्रस्तावाला व्हाईट हाऊसच्या कार्यालयाने मंजुरी दिली आहे. याचा सरळ अर्थ काय? जर उद्या तुमची नोकरी गेली, तर तुम्हाला अमेरिकेत थांबायला एक दिवसही मिळणार नाही; थेट मायदेशी परतावे लागू शकते. पण हा नियम नक्की लागू झाला आहे का? यामागे अमेरिकेचे धोरण काय आहे? आणि याचा सर्वाधिक फटका भारतीय आयटी आणि टेक प्रोफेशनल्सनाच का बसणार आहे? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत