Headlines

Mumbai Milk Price Hike: दूध 9 रुपयांनी महागणार! नवे दर किती, कोणतं दूध? FDA कारवायांचा झटका बसला? – mumbai milk price hike rs 9 september 1 wholesale price rs 102


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे राज्यभर धडक मोहीम आणि कारवाया करताहेत. याचा परिणाम असा झालाय की, राज्यभरातील विविध दूध संकलन केंद्रे, डेअरी आणि गोदामांवर धाडी पडल्यानंतर हजारो लिटर दुधात भेसळ करणारे आणि कृत्रिम दूध तयार करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. कृत्रिम दुधाचा पर्दाफाश करताना स्किम मिल्क पावडर, रसायने, कॉस्टिक सोडा, इमल्सीफायर्स आणि अगदी शाम्पूचा वापर करून तयार केले जाणारे बनावट/कृत्रिम दूध रॅकेट एफडीएने उघडकीस आणलेत. त्यामुळं अनेक जिल्ह्यांत धाडी टाकल्यानंतर आता भेसळ करणाऱ्या टोळ्यांची मोठी यंत्रणा उद्ध्वस्त झालीय. त्यामुळं सामान्यांना मोठ्या प्रमाणावर चांगले आणि गुणवत्ता असलेलं दूध मिळतंय आणि मुंढेंच्या कारवायांचं समर्थन होत असताना कौतुक होताय. मात्र मंडळी हा परिणाम एवढा मोठा झालाय की, मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून कधी नव्हे ते थेट 9 रुपयांची वाढ होणार आहे असं जाहीर करण्यात आलंय. मुंबई दुग्धउत्पादक संघानं हा भाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मुंबईतील दुधाचा घाऊक दर आता प्रति लिटर ९३ रुपयांवरून प्रति लिटर १०२ रुपयांवर जाणार आहे. मुंबईत हे नवे दर १ सप्टेंबर २०२६ पासून लागू होणार असून २८ फेब्रुवारी २०२७ या काळात लागू असणार आहेत. ऐन सणासुदीच्या काळात मुंबई आणि मुंबई उपनगरकरांना हा मोठा झटका बसणार आहे. तेव्हा मुंबईतील शासकीय आणि सहकारी संघाव्यतीरिक्त हा नव्यानं दर जाहीर करणारा संघ कोणता आहे, हे दर एवढ्या मोठ्या स्वरुपात लागू करण्यामागे कोणतं मोठं कारण आहे, सध्या खासगी आणि इतर दूध संघाचे सर्वसामान्यांना गायीचे दूध ७२ रुपये प्रतिलिटरनं मिळत असताना मग हे कोणतं दूध आहे, हे कोण खरेदी करतं आणि याचा सर्वच मुंबईकरांना फटका बसणार आहे का… हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत.#MumbaiMilkPriceHike #MumbaiMilkPrice #MilkPriceHike #MilkRateHike #MumbaiMilkRate #MaharashtraMilkPrice #MilkPriceIncrease #MumbaiMilkProducersAssociation #WholesaleMilkPrice #MilkPrice2026 #MumbaiNews #MaharashtraNews #MilkHike #MilkPriceRise #DairyNews #MilkNews #MumbaiSuburbs #MilkInflation #MilkConsumers #MaharashtraDairyIt has been announced that milk prices in Mumbai will increase by ₹9 per litre from September 1. The Mumbai Milk Producers’ Association has decided to hike the wholesale price from ₹93 to ₹102 per litre. The new rates will be applicable from September 1, 2026, to February 28, 2027. This comes as a major shock for Mumbai and suburban residents, especially during the festive season. So, which association has announced this hike apart from government and cooperative milk unions? What is the major reason behind such a steep increase? When private and other milk unions are selling cow’s milk to consumers at around ₹72 per litre, what type of milk is being sold at ₹102? Who actually buys this milk, and will every Mumbaikar be affected by this price hike? That’s exactly what we’ll explain in this video.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत