Headlines

Omkar Karve On Producer : ‘इंडस्ट्रीला लागलेली किड, तो नुसत्या शिव्या घालत नाही तर लाथाबुक्क्यांनी मारतो’, मराठी अभिनेत्याचे निर्मात्यावर गंभीर आरोप


Omkar Karve : मराठी अभिनेता ओमकार कर्वे सध्या त्याच्या मुलाखतीमुळे चर्चेत आला असून अभिनेत्यानं निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत.

omkar karve allegations on producer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक कलाकाराला चांगले वाईट अनुभव येत असतात. याबद्दल कलाकार अनेक मुलाखतींमध्ये भाष्य करतात. अशातच आता मराठी अभिनेता ओमकार कर्वेसुद्धा त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्यानं या मुलाखतीत त्याचा संघर्षकाळ सांगितला असून निर्मात्यावरही आरोप केले आहेत. तसेच मालिकेच्या सेटवरील आलेला वाईट अनुभवही ओमकारनं या मुलाखतीत सांगितला आहे.

निर्मात्याबद्दल काय म्हणाला ओमकार कर्वे ?

ओमकार कर्वे म्हणाला की, ‘मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रोडक्शन हाऊसेस खूपच चांगली आहेत. पण काही प्रोडक्शन हाऊसच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही. साधारण एक-दोन वर्षांपूर्वी मी त्यांच्याबरोबर काम केलं. सुरुवातीला मला असं वाटलं की, छान काम होईल, सगळ्या गोष्टी छान असतील. पण, जी वाईट परिस्थिती मी आधी पाहिली होती, त्यापेक्षाही कित्येकपटीने वाईट म्हणजे खूपच वाईट परिस्थिती मी त्या सेटवर पाहिली. त्याच्यापेक्षा थर्ड क्लास माणूस मी पूर्ण इंडस्ट्रीमध्ये पाहिला नसेल, इतका तो थर्ड क्लास माणूस आहे. जनावराला सुद्धा तिथे चांगली किंमत होती पण, माणसाला नव्हती. यापूर्वी मी फेसबुकवर याबद्दल पोस्ट शेअर केलेली.’

Maharashtra TimesSaif Ali khan Stabbing Case: सैफ अली खान हल्ला प्रकरणात ट्विस्ट, आधी निर्दोष असल्याच्या गयावया; आता मोहम्मद शरीफुल इस्लामनं दिली गुन्ह्याची कबुली
‘माझी ती पोस्ट त्यांना इतकी बोचली की चॅनेलला त्या माणसानं काय सांगितलं मला माहिती नाही. मला त्या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आलं. माझ्याबरोबर घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो. बाथरूममध्ये पिवळ्या रंगाचा एक डीम लाइट होता. खरंतर, त्यातून काहीच दिसायचं नाही. म्हणून जो प्रोडक्शन मॅनेजर आहे त्याला मी सांगितलं की, मी पैसे देतो फक्त एक पांढरा उजेड पडेल असा बल्ब घेऊन ये. त्यानं लगेच निर्मात्याला सांगितलं आणि त्याचा मला फोन आला, ‘अरे ओमकार काय हे…तू बल्ब वगैरे मागवलास’ म्हटलं हो! पैसे सुद्धा त्याला दिलेत. यावर तो माणूस म्हणाला, ‘बघ असं करू नकोस…मी प्रोडक्शनमध्ये काही नियम सेट केलेले आहेत. तुझ्यासारख्या सिनिअर व्यक्तीनं जर असं केलं तर, मग जे आता नवीन कलाकार येतील…ते आता तुलाच फॉलो करणार.’ माझं असं झालं, मी अशी कोणती मोठी गोष्ट मागितली? पैसे सुद्धा मी दिलेत. फक्त बल्ब आणून द्यायला सांगितला. यात माझी काय मागणी होती? साधा बल्ब मागितला होता.’

Maharashtra TimesPrasad Khandekar : ‘तुझ्याबरोबर हसता येतं, मनातलं बोलता येतं, काहीही न बोलताही खूप काही समजतं’, नम्रता संभेरावसाठी प्रसादची खास पोस्ट
‘हे तर काहीच नाही, त्या प्रोडक्शनमध्ये प्रत्येकाला दोनच पोळ्या मिळायच्या. फक्त दोन पोळ्या मिळणार, चहा फक्त दोन वेळेचा, बरं त्यात सुद्धा गंमत अशी की, आपण जर चहासाठी स्वत:चा कप दिला, तर त्या स्पॉट दादांनी मला सांगितलं, सर हा कप नका देऊ कारण, आम्हाला सांगितलं गेलंय की, असं चालणार नाही, आर्टिस्टना लाडावून ठेवायचं नाही. हे ऐकल्यावर माझं असं झालं, यात लाडाचा काय प्रश्न? आम्ही आमचे कप देतोय, त्यातून आम्हाला फक्त चहा द्या. यापेक्षा जास्त मी काय मागितलं? तुमचा गॅस वाचवण्यासाठी तुमचे हे नियम असतात, कमीत कमी चहा तरी चांगला द्या.’

Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स

ओमकार पुढे म्हणाला की, ‘मी जे वाक्य बोललो ना, जनावराला सुद्धा माणसापेक्षा चांगली ट्रिटमेंट मिळते. सेटवर एक श्वान होता. श्वानाला एक वेगळी रूम होती. त्यात एसी वगैरे होता. बाकी कलाकार सगळं एकत्र मॅनेज करायचे. तुम्ही सेटवर येऊन वाटेल तशा शिव्या घालणार, लोकांना मारणार, त्यांना हडतूड करणार आणि प्रत्येकाला म्हणणार, कुणीही माझ्या आयुष्याचं वाकडं करू शकत नाही. अरे हे सगळं कुणाच्या जीवावर बोलताय? त्यांच्या ओळखीत कुणीतरी बुआ बाबा होता. त्याचा तू भक्त आहेस, त्या बाबाला सुद्धा आता अटक झालीये. तुम्ही प्रत्येक टेक्निशिअनची वाट लावताय, सर्वांची वाट लावताय. पण, अशा निर्मात्यांना काम देणंच चुकीचं आहे.’

Maharashtra TimesKamya Punjabi : ‘माझ्या अंतर्वस्त्रांवर त्यानं कमेंट केली’, लोकप्रिय अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर आरोप, सांगितला मालिकेच्या सेटवरील प्रसंग
‘ज्या व्यक्तीविषयी मी आज बोलतोय, ती इंडस्ट्रीला लागलेली किड आहे. पण, त्या माणसाविषयी कुणीही बोलत नाही. कारण, प्रत्येकाच्या मनात भीती आहे की, आपण आज काही बोललो तर उद्या आपल्याला काम मिळणार नाही. पर डेवर जे कलाकार काम करतात, त्यांना खरंच भीती आहे. पण, जे अनुभवी कलाकार आहेत त्यांनी बोललं पाहिजे. कारण, हा माणूस मारतो, नुसत्या शिव्या घालत नाही तर लाथाबुक्क्यांनी मारतो. या अशा माणसांना इंडस्ट्रीच्या बाहेर काढलं पाहिजे.’ असं ओमकारनं शेवटी म्हटलं आहे. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत ओमकार बोलत होता.