Headlines

मुंबईच्या महापौर रितू तावडे व भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं खास फोटोशूट,फोटो तुफान व्हायरल – mumbai mayor ritu tawde and bjp leader chitra wagh raksha bandhan 2026 photoshoot


रक्षाबंधनाच्या निमित्ताने रितू तावडे आणि चित्रा वाघ यांचा पारंपरिक अंदाजातील खास फोटोशूट चर्चेत आलं आहे.प्रसन्न हास्य आणि आपुलकीच्या क्षणांमुळे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Mumbai Mayor Ritu Tawde and Chitra Wagh Photoshoot
फोटो सौजन्य :- @tawderitu_
रक्षाबंधनाचा सण म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव नाही, तर प्रेम, आपुलकी, विश्वास आणि नात्यांमधील जिव्हाळा जपण्याचा दिवस. याच भावनेचा प्रत्यय मुंबईत यंदाच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे रक्षाबंधनाच्या निमित्ताने टिपलेले खास फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. रितू तावडे आणि चित्रा वाघ यांचा बागेतील हा पारंपरिक पेहरावातील फोटो लक्षवेधी ठरत आहे. एका छायाचित्रात दोघीही हातात हात धरून चालताना दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावरील सहज भाव आणि आजूबाजूचा हिरवाईने नटलेला परिसर या फोटोला विशेष आकर्षण मिळवून देतो. त्यामुळे या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य :- @tawderitu_)

2

2

रितू तावडे यांचा साधेपणा

रितू तावडे यांचा साधेपणा

या फोटोमध्ये रितू तावडे यांचा साधा, सोज्वळ आणि प्रसन्न अंदाज विशेष लक्ष वेधून घेतो. कोणताही भपकेबाजपणा न करता त्यांनी पारंपरिक पिवळ्या साडीत आपला लुक खुलवला आहे. साडीवरील नाजूक डिझाइन, पारंपरिक दागिने आणि केसांमधील गजरा यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा अधिक उठून दिसतो.

चित्रा वाघ यांचा लुक

चित्रा वाघ यांचा लुक

या फोटोमध्ये चित्रा वाघ यांचा पारंपरिक, सोज्वळ आणि आकर्षक लुक विशेष लक्ष वेधून घेतो. त्यांनी सुंदर जांभळ्या रंगाची पारंपरिक साडी नेसली आहे. साडीवरील बारीक नक्षीकाम आणि आकर्षक बॉर्डरमुळे त्यांच्या लुकला अधिक उठाव मिळाला आहे.त्यांनी साडीला साजेसा जांभळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला असून, गळ्यातील पारंपरिक दागिने आणि कानातील दागिन्यांमुळे त्यांचा लुक अधिक खुलून दिसतो. कपाळावरची लाल टिकली आणि कुंकू त्यांच्या पारंपरिक व्यक्तिमत्त्वाला विशेष उठाव देतात.

रितू तावडे आणि चित्रा वाघ यांचं खास फोटोशूट चर्चेत

रितू तावडे आणि चित्रा वाघ यांचं खास फोटोशूट चर्चेत

रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा पारंपरिक अंदाजातील खास फोटोशूट सध्या लक्ष वेधून घेत आहे. हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात दोघींनी टिपलेले हे क्षण अगदी प्रसन्न आणि आपुलकीचे वाटतात.पिवळ्या साडीत रितू तावडे यांचा सोज्वळ आणि साधेपणाने खुललेला लुक, तर जांभळ्या साडीत चित्रा वाघ यांचा पारंपरिक आणि उठावदार अंदाज फोटोमध्ये पाहायला मिळतो. दोघींच्या साडीपासून ते पारंपरिक दागिने, गजरा आणि टिकलीपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांच्या लुकला शोभून दिसते.

फोटोवर कमेंट्स

फोटोवर कमेंट्स

रितू तावडे आणि चित्रा वाघ यांचा हा पारंपरिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. दोघींच्या साडीतील सोज्वळ लुकपासून त्यांच्या मैत्रीपूर्ण अंदाजापर्यंत अनेक गोष्टींची चर्चा होताना दिसत आहे.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा