Pravin Pote and Ravi Rana Reconcile: निवडणुकीच्या सुरुवातीला माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. यानंतर पोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राणा दाम्पत्य अनुपस्थित होते.

युवा स्वाभिमान पक्षाचे २६ नगरसेवक आणि नवनीत राणांचा भाजपमधील एक गट मिळून ही मते पोटे यांच्यासाठी अत्यंत निर्णायक होती. त्यामुळे राणांची ही साशंक भूमिका पोटे यांच्या गोटात चिंता वाढवणारी ठरत होती. अमरावती मतदारसंघात विजयासाठी २२७ मतांची गरज आहे. महायुतीकडे हक्काची २५० मते आहेत. यात भाजपची १५२ मते आहेत. काँग्रेस सुरुवातीला आक्रमकतेने लढत होती, ते पाहता पोटे यांना कोणतीही जोखीम पत्करायची नव्हती. आता राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाची २६ मते पोटे यांच्या पारड्यात अधिकृतपणे पडणार असल्याचे स्पष्ट झाल्याने महायुती सुरक्षित झोनमध्ये पोहोचल्याची चर्चा वाढली आहे.
Nashik Politics: वादग्रस्त फाइलसाठी नगरसेवकाचा कनिष्ठ अभियंत्यावर हात उगारत थयथयाट, महापालिकेतच वादावादी, नेमकं काय घडलं?
काँग्रेस ‘व्हेंटिलेटरवर’
महायुतीने आपली अंतर्गत फळी मजबूत केली असताना, दुसरीकडे काँग्रेसमध्ये अभूतपूर्व गोंधळ आणि उदासीनतेचे वातावरण आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख हे गेल्या पाच दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ राहिल्याने आणि थेट नागपूरच्या रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल झाल्याने काँग्रेसच्या प्रचाराचा पुरता बोजवारा उडाला आहे. काँग्रेस नेत्या अॅड. यशोमती ठाकूर यांनी स्वपक्षाच्या उमेदवारावर १५ ते २० कोटी रुपयांचा ‘घोडेबाजार’ करून निवडणूक मॅनेज केल्याचा जाहीर आरोप केल्याने महाविकास आघाडीच्या गोटात नैराश्य वाढले आहे.
Farmer Loan Waiver: शेतकरीहितासाठीच कर्जमाफी; 40 लाख जणांना अटींविना लाभ मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
फडणवीस, बावनकुळे यांची फिल्डिंग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. बावनकुळे यांनी सातत्याने राणांच्या संपर्कात राहून डॅमेज कंट्रोलची धुरा सांभाळली. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राणा दाम्पत्याने मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पोटे यांच्या विजयासाठी संपूर्ण ताकदीने पाठीशी राहण्याचे स्पष्ट निर्देश राणा यांना दिले होते. याच वरिष्ठ पातळीवरील ‘पॉवर गेम’ मुळे पोटे थेट राणांच्या दारी पोहोचले आणि अमरावतीच्या राजकारणातील मनोमिलनावर शिक्कामोर्तब झाले.

