Headlines

Gold Silver Price Hike 27 August 2026; सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम; सणासुदीच्या तोंडावर सामान्यांच्या खिशाला झळ, हौस पूर्ण करण्याची हीच का वेळ?


Today’s Gold and Silver Rate 27 August 2026: सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा रंगात आले आहेत. आदल्या दिवशी (26 ऑगस्ट रोजी) अचानक झालेल्या घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या दरांनी ऐन रक्षाबंधनआधी हिरवीगार सुरुवात केली आहे. मॅक्रोइकॉनॉमिक घडामोडी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीला आधार देत असताना गुरुवार, 27 ऑगस्टच्या सुरुवातीच्या सत्रात सोन्याचे भाव वधारले.

Gold Silver Rate Hike News
सोन्या-चांदीच्या किमतीत दरवाढ सुरूच(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Gold Price News: सणासुदीच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या दरांमध्ये चढ-उताराचा कल सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांनी मोठी वाढ नोंदवली तर चांदीचा दरही सुस्साट वाढला होता. पण आदल्या दिवशी अचानक देश-विदेशातील सराफा बाजारांमध्ये पडझड झाली त्यामुळे, आता गुंतवणूक करताना कोणती रणनीती अवलंबली पाहिजे किंवा खरेदीसाठी आणखी काही काळ वाट पाहायची की आताच खरेदी करायचं, असा ग्राहकांमध्ये संभ्रम दिसत आहे.

सोन्या-चांदीच्या किमतीत दरवाढीचा ट्रेंड सुरूच

मध्य-पूर्वेतील अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेली अनिश्चितता सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीला आधार देत राहिल्यामुळे गुरुवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या दरात जवळपास 0.46% वाढ झाली. यासह भारतीय वायदा बाजारात MCX वर सोन्याचे फ्युचर्स आदल्या दिवसाच्या घसरणीनंतर गुरुवारी 1.60 लाखांवर स्थिर राहिले तर, चांदीच्या फ्युचर्स किंमती 2.41 लाख रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत.

Maharashtra TimesFixed Deposit: ऐका हो, FD करायची घाई करू नका; छोट्या-छोट्या गोष्टी ठरतात नुकसानदायी, अडकेल तुमच्या मेहनतीची कमाईदुसरीकडे, किरकोळ बाजारात ibja च्या आकडेवारीनुसार, गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,59,400 रुपये 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,46,117 रुपये 10 ग्रॅम इतकी आहे. तसेच, आज चांदीचा दर 2,40,240 रुपये किलो इतका आहे. ग्राहकांनी लक्षात घ्या की, सराफ बिलामध्ये घडणावळ, कर आणि जीएसटी आकारले जातात ज्यामुळे वस्तूंची अंतिम किंमत वाढू शकते. तसेच पुढील काळात, अमेरिकेची जीडीपी आकडेवारी आणि अमेरिका-इराण यांच्यातील घडामोडी या बुलियन बाजारासाठी महत्त्वाचे घटक ठरतील.

Maharashtra TimesStock Crash: खटाखट परतावा देणारा शेअर धडाधड आपटला; 400 रुपयांवरून 12 रुपयांवर आला, गुंतवणूकदारांची पंचाईत

सोने आणि चांदीचा आतापर्यंतचा परतावा

गेल्या वर्षी सोन्याच्या दरांनी 1979 नंतरची सर्वात मोठी तेजी नोंदवली आणि वर्षभर 75 टक्क्यांहून जास्त मोठी उसळी घेतली. मात्र त्याउलट अलीकडच्या काही महिन्यांत सोन्याची मागणी आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे पिवळसर धातूंच्या दरांमध्ये माफक वाढ झाली. दुसरीकडे, मजबूत मागणी आणि चलनातील चढ-उतारामुळे चांदीच्या दरांमध्ये त्याहूनही मोठी वाढ दिसून आली. 2023-24 मध्ये सामान्यतः 78,600 रुपये किलो असलेले चांदीचे दर ऑगस्ट 2026 पर्यंत 2,40,000 रुपये किलोवर पोहोचले.

Maharashtra Times8th Pay Commission: 400 टक्के पगारवाढ? 18000 मूळ पगार असणाऱ्यांना मिळणार 72 हजार Basic Pay, पण एकच अडचण; वेतन आयोगाकडे नजर

सोने-चांदीच्या दरवाढीला कारणीभूत घटक

मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाला या मौल्यवान धातूंच्या किमतींमधील वाढीचे श्रेय दिले जाऊ शकते. गेल्या पाच महिन्यांपासून अमेरिका-इराण यांच्यात संघर्ष सुरू असून निवळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. अलीकडेच ट्रम्प प्रशासनाने सोमवारी इराणची अर्थव्यवस्था एकाकी पाडण्याची योजना जाहीर केली, ज्याअंतर्गत इस्लामिक रिपब्लिकला (इराणला) तग धरून ठेवण्यास मदत करणाऱ्या घटकांवर दुय्यम निर्बंध लादण्याची धमकी दिली. दुसरीकडे, इराणने अमेरिकेने सोमवारी जाहीर केलेले नवीन निर्बंध या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यास मदत करणार नाही असा इशारा दिला.