29 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

तरुणांच्या आंदोलनांनी देशातील शिक्षण व्यवस्थेचीस्थिती बदलण्यासाठी सरकारवर दबाव वाढवला आहे.20 जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्यालाठीहल्लाप्रकरणी राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिकाघेतली आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्नकरत आहे. त्यामुळे 2027 च्या सुरुवातीला होणाऱ्याविधानसभा निवडणुकांच्या तयारीकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे. भाजपवरही आपले राजकीय वर्चस्व पुन्हाप्रस्थापित करण्याचा दबाव वाढला आहे.
आगामी निवडणुकांच्या तयारीचे पहिले पाऊल म्हणूनभाजपने नुकतेच आपल्या संघटनेत फेरबदल केले आहेत.भाजप अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आठ महिन्यांनीनितीन नवीन यांनी अखेर आपली नवीन टीम जाहीरकेली. यात काही धक्कादायक नावे समोर आली. स्मृतीइराणी आणि राम माधव यांचे पुनरागमन झाले. पण हेबदल फारसे नाट्यमय नव्हते. नव्या आव्हानांनुसारपक्षाला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आहे.भाजपच्या अंतर्गत रचनेत व संघ परिवारासोबतच्यासंबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो.
अनुभव वबदल यांना एकत्र आणत पक्षातील विविध गटांनाजोडण्याचे प्रयत्नही यात स्पष्ट दिसतात. 1990 च्यादशकात लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपमध्ये तरुणनेतृत्वाला घडवण्याचे काम सुरू केले होते. त्यांनी सुषमास्वराज, प्रमोद महाजन, गोविंदाचार्य, व्यंकय्या नायडू वउमा भारती यांसारख्या तरुण नेत्यांना पुढे आणले.अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेत हीचमंडळी त्यांची मुख्य टीम होती. गुजरातवरून ही यात्रा सुरूकरण्यात नरेंद्र मोदी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावलीहोती. पुढे अरुण जेटली समोर आले. कर्नाटकातून अनंतकुमार यांचा उदय झाला. मागे वळून पाहिल्यासभाजपमध्ये नवे नेतृत्व तयार करणे हे अडवाणी यांचे सर्वात मोठे योगदान मानले जात होते. संघटनेतील बदलानंतरआता लोक संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाची वाट पाहत आहेत. 12 वर्षांच्या सत्तेनंतर कथित असंतोषाचा सामना करण्यासाठी पक्ष काय करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.पक्ष यासाठी एखादा मोठा निर्णय घेणार, की संथ गतीनेबदल करण्याचा मार्ग निवडणार?
वास्तविक, चार महत्त्वाच्या कारणांमुळे पक्ष संघटनेत फेरबदल करणे अनिवार्य झाले होते. पहिले कारण म्हणजे ‘जेन-झी’ आणि ‘जेन-अल्फा’ चे आव्हान. जंतर-मंतरव झारखंडसह देशाच्या विविध भागात शाळकरी मुलांनी केलेल्या आंदोलनांवरून हे आव्हान स्पष्ट झाले आहे.तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पारंपरिक राजकीय पक्षांपेक्षा वेगळे असलेले हे तरुण सरकारच्या कोणत्याही अटींवर तडजोड करण्यास तयार नाहीत. भूतकाळातविरोधी पक्ष मुद्दे उपस्थित करत असत, आपली बाजूमांडत असत आणि राजकीय फायदा घेत असत. नंतरकाही मागण्या मान्य झाल्यावर सरकारसोबत तडजोडकरत असत. पण ‘जेन-झी’ आणि ‘जेन-अल्फा’आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. भाजप त्यांच्याशीसंवाद वाढवू इच्छितो. याचा मार्ग सोशल मीडिया त्यातही ‘इन्स्टाग्राम’द्वारे जातो असे दिसते; त्याकडे पक्षानेआतापर्यंत दुर्लक्ष केले होते. पक्ष ‘एक्स”” (ट्विटर)आणि ‘फेसबुक””वर अधिक लक्ष केंद्रित करत होता.भाजपने आपल्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीययांना हटवणे म्हणजे त्यांनी स्वीकारलेली आक्रमक शैलीआता प्रभावी राहिलेली नाही, याची कबुलीच होती.भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका वर्गालाअसेही वाटते की, 20 जुलै रोजी आंदोलनकर्त्यांवरकेलेल्या बलप्रयोगाचा विपरीत परिणाम झाला आहे.
दुसरे स्पष्ट कारण म्हणजे 2027 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब,गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि गोवायेथे होणाऱ्या विधानसभा निवडणुका. नव्या चेहऱ्यांच्याआगमनाने या राज्यांमध्ये पक्षाच्या कामात नवी ऊर्जायेईल, अशी अपेक्षा आहे. आम आदमी पक्ष सोडूनभाजपमध्ये प्रवेश केलेल्या सात राज्यसभा खासदारांपैकीएक असलेल्या संदीप पाठक यांना राष्ट्रीय सचिवकरण्यात आले आहे. सहसा हे पद पक्षात नव्याने आलेल्यालोकांना दिले जात नाही. यावरून भाजप नेतृत्व पंजाबलाकिती महत्त्व देत आहे हे दिसून येते. 2022 मध्ये आमआदमी पक्षाच्या पंजाबमधील निवडणुकीतील विजयातसंदीप पाठक यांनी डेटा डिझायनिंग, बूथ मॅनेजमेंट आणिडिजिटल मीडिया आधारित रणनीती आखण्यातमहत्त्वाची भूमिका बजावली होती.
भाजप आता या सीमावर्ती राज्यात आपली स्थिती भक्कमकरण्यासाठी आणि सत्ता स्थापनेच्या शर्यतीत स्वतःलामजबूत खेळाडू म्हणून मांडण्यासाठी पाठक यांच्याअनुभवाचा वापर करू इच्छितो. ‘महिला”” हा घटक2027 च्या विधानसभा निवडणुका आणि 2029 च्यालोकसभा निवडणुकीत भाजपचा मुख्य मंत्र असणारआहे. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात याचे संकेतदिले होते. महिला आरक्षण विधेयकासोबतच परिसीमन(प्रभाग रचना) विधेयक मंजूर करता यावे, यासाठीभाजप संसदेत दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचा प्रयत्नकरत आहे. स्मृती इराणी यांना सरचिटणीस तर वसुंधराराजे यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. पक्षाच्या 15उपाध्यक्षांपैकी आता 6 महिला आहेत. 65 सदस्यांच्या याटीममध्ये एकूण 12 महिला आहेत, म्हणजेच हे प्रमाण 18टक्क्यांहून अधिक आहे. तिसरा घटक म्हणजेआरएसएस. संघाने नेहमीच भाजपच्या संघटित रचनेलाप्राधान्य दिले आहे. पक्ष संघटना बांधणीत आपली भूमिकाअसावी, अशी संघाची इच्छा असते. बी. एल. संतोषराष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) म्हणून कायम राहणे हेदर्शवते की पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये संघाचे महत्त्वकायम आहे.
फेरबदलामागील चौथे कारण म्हणजे भाजप नेतृत्वपक्षातील अंतर्गत शक्ती-गट आणि संघ परिवार यांच्यातसमतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी बाजूलापडलेल्या राम माधव व स्मृती इराणी यांचे पुनरागमन झाले.भाजपची ही नवीन टीम केवळ अमित शाह यांच्यापसंतीची नाही, असा संदेश यातून दिला जात आहे;त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्यामिळाल्या तरीही. नव्या टीममध्ये सुनील बन्सल यांचाहीसमावेश आहे. त्यांनी पूर्वी उत्तर प्रदेश व अलीकडेबंगालमधील विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.विनोद तावडे हे देखील महत्त्वाच्या सरचिटणीसांमध्येसामील आहेत. (लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे.)

12 वर्षांच्या सत्ताकाळानंतरआता पक्षाची भूमिका काय ?संघटनेतील बदलानंतर आता लोकांचे लक्षमंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. 12वर्षांच्या सत्ताकाळानंतर भाजप वाढत्याअसंतोषाला कसा तोंड देतो, हे पाहणेमहत्त्वाचे ठरेल. पक्ष यासाठी काही कठोरपावले उचलणार की संथ आणिटप्प्याटप्प्याने बदल करण्याचा मार्गनिवडणार, याबद्दल उत्सुकता आहे.

