Headlines

Pune Kothrud 17 Year Old Minor Boy Killed by Friends at Vetal Tekdi Over WhatsApp Status Dispute; पुण्यात दोस्तीत कुस्ती! व्हॉट्सॲपवर स्टेटसमुळे डोक्यात सणक, वेताळ टेकडीवर बोलावून जवळच्याच मित्रांनी काटा काढला; अल्पवयीन मुलाचा मृत्यू


Pune Crime News : सोशल मीडियावरील ‘स्टेटस’वरुन झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आल्याची घटना कोथरुडमधली एआरएआय टेकडीवर बुधवारी पहाटे घडली. मुलाच्या डोक्यात हातोडीने वार करण्यात आले. या प्रकरणी दोन अल्पवयीनांना कोथरुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Pune Crime News
वेताळ टेकडी अल्पवयीन मुलाची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजीत दराडे, पुणे : ​पुण्यातील वेताळ टेकडी परिसरात एका 17 वर्षांच्या मुलाची त्याच्याच जवळच्या मित्रांनी डोक्यात हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील ‘विरोधी गटाचे स्टेटस’ ठेवल्याच्या क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

काही महिन्यांपासून त्यांच्यात घनिष्ठ मैत्री

​मयत तरुण आणि ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी हे विधीसंघर्षित बालक असून त्यांचे वय 17 वर्षे आहे. हे तिघेही कोथरूडमधील श्रावणधारा सोसायटी परिसरातील रहिवासी असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. मयत मुलगा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता, तर आरोपींपैकी एक जण बारावीत शिकत असून दुसरा कोणताही व्यवसाय किंवा काम करत नव्हता.

Maharashtra TimesAccident News : ‘मामा, दादाची ड्युटी संपली, मी घेऊन येतो’; दोन्ही भाचे पुन्हा परतलेच नाहीत, सख्ख्या भावांचा करुण अंत; बापावर लेकरांना खांदा देण्याची वेळ

विरोधी गटाच्या समर्थनार्थ व्हॉट्सॲपवर स्टेटस

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन आरोपीचा स्थानिक पातळीवरील दुसऱ्या एका गटाशी वाद झाला होता. या वादावरून या मित्रांमध्ये वारंवार चर्चाही झाली होती. मात्र, मयत तरुण सतत आरोपींच्या विरोधी गटाच्या समर्थनार्थ व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत होता. ‘तू आपल्या विरोधकांचे स्टेटस ठेवू नकोस,’ अशी ताकीद आरोपींनी त्याला अनेकदा दिली होती. मात्र, मयत मुलानं त्याकडे दुर्लक्ष करत स्टेटस ठेवणं सुरूच ठेवल्यामुळे आरोपींच्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण झाला होता.

वर्मी घाव बसल्यामुळे जागीच मृत्यू

​याच वादातून आरोपींनी त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. मयत मित्राला संशय येऊ नये म्हणून त्यांनी त्याला राजगडावर फिरायला जाण्याची गळ घातली. मंगळवारी हे तिघेही राजगडावर गेले आणि दिवसभर फिरून रात्री उशिरा पुण्यात परतले. शहरात आल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्याला बहाणा करून वेताळ टेकडीवरील मोकळ्या भागात नेलं. मध्यरात्रीच्या सुमारास संधी साधून आरोपींनी सोबत आणलेल्या हातोड्यानं त्याच्या डोक्यावर जोरदार वार केले. वर्मी घाव बसल्यामुळे तो जागीच कोसळला आणि त्याचा तडफडून मृत्यू झाला. यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

Maharashtra TimesTrimbak News: त्र्यंबकला संशयकल्लोळ; रुग्णालयाला आरक्षित जागा तरी देखील खाजगी जागांच्या ठरावाची मागणी

कोथरूड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा

​बुधवारी सकाळी व्यायामासाठी टेकडीवर गेलेल्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसताच त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून कोथरूड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन्ही अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतलं. मयत मुलाच्या कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोथरूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा