Headlines

Importance Of Privacy And Confidentiality In Relationships


  • Marathi News
  • Opinion
  • Importance Of Privacy And Confidentiality In Relationships | Vijay Shankar Mehta

4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माणूस हा मुळातच गूढ असतो. त्याच्या मनात काय चालले आहे व‎त्याचे तुमच्याशी असणारे वर्तन नेमके कसे आहे, हे आयुष्य संपले‎तरी पूर्ण कळत नाही. अगदी जवळच्या नात्यांमध्येही हे घडते. इथे दोन‎शब्द महत्त्वाचे आहेत—खासगीपणा आणि गोपनीयता. पती-पत्नीचे‎नाते हे सर्वात जवळचे मानले जाते. या नात्यातही ही परिस्थिती निर्माण‎होते. वास्तविक, या नात्यात गोपनीयता असायलाच नको.

पण स्त्री व‎पुरुष दोघांचाही खासगीपणा जपला पाहिजे. कारण प्रत्येक माणसाला‎स्वतःची जागा, स्वतःचे स्वातंत्र्य हवे असते. समंजस जोडपी‎एकमेकांपासून काहीही लपवून ठेवत नाहीत. तिथे 200% पारदर्शकता‎असते. पण तरीही ती एकमेकांच्या खासगीपणाचा पूर्ण आदर करतात.‎कारण खासगीपणाचा थेट संबंध माणसाच्या आत्मसन्मानाशी‎असतो. आपण सार्वजनिक आयुष्यात असो वा कौटुंबिक जीवनात‎स्वतःचा आणि इतरांचा खासगीपणा नेहमी जपावा. तसेच कुठे‎गोपनीयता हवी, कुठे नको, याचे भान ठेवणेही तितकेच गरजेचे आहे.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत