Headlines

Buldhana Crime: घरातच गर्भलिंग निदान; बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडलं, बुलढाणा जिल्ह्यातील परतापूर येथे कारवाई


Illegal Gender Detection Racket: बोगस डॉक्टर सोनुने याने गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपाताचीही तयारी ठेवली होती. सोबत औषधे आणि इन्जेक्शन नेले होते. हे साहित्यदेखील पथकाने जप्त केले.

buldhana crime
बुलढाणा क्राईम(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, बुलढाणा : मेहकर तालुक्यातील परतापूर येथे एका घरात महिलेची सोनोग्राफी मशिनद्वारे गर्भलिंग निदान चाचणी करीत असतानाच एका बोगस डॉक्टरला पीसीपीएनडीटी पथकाने रंगेहात पकडले. शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पोलिसांच्या मदतीने छापा टाकून डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले. तसेच सोनोग्राफी मशिन व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी घरमालकासह डॉक्टरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

अनिल रामदास सोनुने असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. मेहकर तालुक्यातील परतापूर येथे रसाळ नावाच्या व्यक्तीच्या घरात बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना मिळाली. त्यांनी तातडीने पीसीपीएनडीटी पथकाला अलर्ट केले. सापळा रचण्यात आला.

Maharashtra TimesMumbai Local Crime: मुंबई लोकलमध्ये नक्की काय चाललंय? आधी तरुणाला संपवलं, आता Sorry बोलल्यानंतरही एकाला चाकूने भोसकलं
मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता हिवसे, मेहकर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, एपीआय बिरांजे, राठोड, लक्ष्मण कटक, शिवनकर, संदीप भोंडाने, मोहंमद परसुवाले, केशव अवचार, सरकटे तसेच रुग्णालयाच्या अधिपरिचारिका मंगला वायाळ, प्रशांत बोरे, वरिष्ठ लिपिक वायाळ यांनी परतापूर येथे रसाळ याच्या घरावर सकाळी अकरा वाजेपासून पाळत ठेवली.

बोगस डॉक्टर अनिल सोनुने हा दुपारी अडीच, तीनच्या सुमारास रसाळच्या घरात शिरल्यानंतर त्याने महिलेच्या गर्भाचे सोनोग्राफी मशिनद्वारे लिंग निदान सुरू केले. त्याचक्षणी छापा मारून डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत एक पोर्टेबल सोनोग्राफी मशिन जप्त करण्यात आले. डॉक्टरसह घरमालक रसाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Maharashtra TimesPraful Gudadhe On Vishwas Nagre Patil: विश्वास नांगरे पाटील माझा एन्काऊंटर करतील; नागपूर काँग्रेस शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
तर दुसऱ्या एका घटनेत, यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटप्रकरणी विशेष तपास पथकाने कारवाई केली. तपासादरम्यान, डॉ. सुमंत तुकाराम शितोळे (वय ३८, मंगलमूर्ती हॉस्पिटल, रा. पारगाव, ता. दौंड) आणि बापूराव पंढरीनाथ जांबले (वय ५७, रा. वासुंदे, ता. दौंड) या दोन प्रमुख आरोपींना २६ जूनला अटक केली. न्यायालयाने दोघांनाही एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. सुमंत तुकाराम शितोळे हा आरोपी अण्णासाहेब आप्पा गिरी यांच्याकडून बेकायदा गर्भलिंग निदान झालेल्या गरोदर महिलांना आपल्या पारगाव येथील मंगलमूर्ती हॉस्पिटलला आणून बेकायदा गर्भपात करीत होता. बापूराव पंढरीनाथ जांबले हा रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करीत होता. तो बेकायदा गर्भपातासाठी लागणारी प्रतिबंधित औषधे व इंजेक्शन मुख्य आरोपींना गायकवाड हॉस्पिटलमध्ये पुरवत असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा