एकनाथ शिंदेंची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. ती हिंदुत्वासाठी लढणारी शिवसेना आहे ती विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही. उरला प्रश्न उरला सुरला उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करायचा की समाजवादी पक्षामध्ये विलीन करायचा याची चर्चा मातोश्रीवर
.
नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी यांना वाटते की संजय राऊतांसह उबाठाने काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजे तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना वाटते की आपला पक्ष समाजवादी पार्टीमध्ये विलीन करावा. आता दोन्हीपैकी एका पक्षात आपला गट विलीन केल्याशिवाय उद्धव ठाकरेंना पर्याय नाही. एमआयएम सारख्या पक्षाचा सुद्धा त्यांना पर्याय आहे. एकनाथ शिंदे यांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे. तर भाजप आणि महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत आहेत.

उद्धव ठाकरेंनी त्यावर बोलावे
नवनाथ बन म्हणाले की, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना होती. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच सोडून दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी केवळ विधीमंडळ पक्षावर बोलू नये त्यांनी हे सांगावे की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनीनो हे म्हणायचे मी सोडून दिले. उद्धव ठाकरेंची वैचारिक पडझड झाल्याने ती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मार्गक्रमण करत आहे. कोर्टात जो निकाल लागायचा तो लागेल पण जनतेच्या कोर्टात निकाल लागला आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे हे जनतेने सिद्ध केले आहे, असाच सकारात्मक निर्णय कोर्टात होईल असे वाटते.
गडचिरोलीमधील पुलाचे काम मविआच्या काळातील
नवनाथ बन म्हणाले की, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काठावर पास झालेले आमदार रोहित पवार यांनी गडचिरोलीमध्ये जो पुल कोसळला याबद्दल पोस्ट करत नाकाने कांदे सोलले.गडचिरोलीमध्ये जिथे पुल कोसळला त्याचे बांधकाम हे मविआ सरकारच्या काळात झाले.या पुलाचा करारनामा जानेवारी 2020 मध्ये झाला आणि या पुलाचे काम 2022 मध्ये हे काम पूर्ण झाले. या दोन वर्षांमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि रोहित पवार मविआतील आमदार होते.
रोहित पवार ठाकरेंना सवाल करणार का?
नवनाथ बन म्हणाले की, गडचिरोलीत पुलाच्या कामात उद्धव ठाकरे आणि मविआने किती टक्के घेतले यांचे उत्तर दिले पाहिजे. तुमच्या कार्यकाळात तयार झालेला पुल अवघ्या 3 वर्षांमध्ये कोसळला. 2023 मध्ये महायुतीचे सरकार आले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन झाले पण त्यांचे काम मविआच्या काळातच झाले आहे. कंत्राटदाराने उद्धव ठाकरेंच्या काळात तयार केला आहे यामुळे रोहित पवार उद्धव ठाकरेंना सवाल करणार का? असा सवाल बन यांनी केला आहे. दलदल कोणी केली, कोणी पैसे खाल्ले, याचे उत्तर रोहित पवारांनी दिले पाहिजे.
हे ही वृत्त वाचा
बेईमानी करणाऱ्यांना कायद्यानेच संपवू:संजय राऊतांचा शिंदेंना इशारा, भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांना पर्याय नसल्याचा दावा

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. “ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात अतिशय धारदार युक्तिवाद केल्याने शिंदे गटात चलबिचल सुरू झाली आहे. आता त्यांच्यासमोर स्वतःचा गट भाजपमध्ये किंवा प्रहारसारख्या छोट्या पक्षात विलीन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही,” असे सूचक विधान राऊत यांनी केले आहे. याचवेळी त्यांनी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींवर टीका करणाऱ्या भाजपलाही उत्तर दिले आहे. वाचा सविस्तर
