Headlines

पुढील पाच वर्षांत सिंधुदुर्गनगरी शहराचा कायापालट करणार – पालकमंत्री नितेश राणे


सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : तब्बल तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्गनगरीतील नागरिकांच्या हक्काच्या जमिनीचा सातबारा अखेर त्यांच्या नावावर देण्याचा ऐतिहासिक क्षण सोमवारी साकार झाला. या निमित्ताने झालेल्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरीचा सर्वांगीण विकास हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगत, पुढील पाच वर्षांत जिल्हा मुख्यालयाचा कायापालट करून ते आदर्श शहर म्हणून विकसित करू, अशी ग्वाही दिली. तसेच सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीची घोषणा लवकरच होईल, असेही त्यांनी जाहीर केले.

नवनगर प्राधिकरण रहिवासी संघ, सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने आयोजित सातबारा लोकार्पण सोहळा शरद कृषी भवन येथे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष दादा साईल, तहसीलदार चैताली सावंत, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, ओरोस सरपंच पांडुरंग मालवणकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, प्राधिकरण संघाचे अध्यक्ष आदेश नाईक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत