न्हावेली /वार्ताहर : हरिनाम सप्ताहनिमित्त हनुमान भजन मंडळ,आरोस बाजार आयोजित गाव मर्यादित अंभग गायन स्पर्धेत राजाराम आरोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.द्वितीय क्रमांक तन्मय मोरजकर तर तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २,००० रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक १,००० रुषये व सन्मानचिन्ह,तृतीय पारितोषिक ५०० रुपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सत्यनारायण कळंगुटकर यांनी काम पाहिले.यावेळी बक्षिस वितरण करताना दाडेंली सरपंच नीलेश आरोलकर,बाबू गोडकर,नाना परब,देवेंद्र माणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
