Bombay High Court questions police over Disha Salian Death investigation father demands CBI inquiry Crime News; आदित्य ठाकरेंवर FIR नोंदवून CBI तपास व्हावा, दिशा सालियानच्या वडिलांची विनंती, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना खडसावलं
Bombay High Court questions police over Disha Salian Death investigation father demands CBI inquiry Crime News; आदित्य ठाकरेंवर FIR नोंदवून CBI तपास व्हावा, दिशा सालियानच्या वडिलांची विनंती, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना खडसावलं
Disha Salian Death Case : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून सीबीआय तपासाचा आदेश देण्याची विनंती दिशा सालियनच्या वडिलांनी ॲड. नीलेश ओझा यांच्यामार्फत केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘दिशा सालियानच्या मृत्यूबाबत वडिलांनी संशय व्यक्त केला होता, तर पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? अपघाती मृत्यूचे प्रकरण का दाखल केले? कोणत्या बाबींमुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यापासून रोखण्यात आले?’ असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई पोलिसांसमोर उपस्थित केला.
दिशा सालियान गूढ मृत्यू
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर असलेल्या दिशाचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. चौकशीअंती दिशाने जीव दिल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी गेल्या वर्षी याचिका करून आपल्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप केला आहे. या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून सीबीआय तपासाचा आदेश देण्याची विनंतीही सालियन यांनी ॲड. नीलेश ओझा यांच्यामार्फत केली आहे. Crime News : कॅब चालकाचे प्रवाशाशी प्रेमसंबंध जुळले, बायकोचा काटा काढला अन् तिच्यावरच खापर फोडलं, दोघं अटकेत
न्यायालयाच्या खंडपीठाने असाही प्रश्न उपस्थित केला की, शवविच्छेदन अहवालानुसार, इतक्या उंचावरुन पडूनही संबंधित व्यक्तीच्या शरीरावर कोणतीही दुखापत का आढळली नाही. “जर एखादी व्यक्ती १४ मजल्यांच्या उंचीवरुन खाली पडली, तर तिच्या शरीरावर काहीच जखमा होणार नाहीत का?” असा प्रश्न न्यायमूर्ती डांगरे यांनी विचारला. त्यावर हिरे यांनी सांगितले की, छायाचित्रांनुसार संबंधित व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली होती. पुढील सुनावणी २४ ऑगस्टला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा