Headlines

Rohit Pawar Gives Information About His Health Admitted in Breach Candy Hospital


रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. विविध माध्यमांनी याबाबत वृत्त दिल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत आपल्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे.

Rohit Pawar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण तडफदार आमदार रोहित पवार मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. रोहित पवार प्रकृती अस्वस्थामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. रोहित पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विविध माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले. एसआरए कार्यालयाला भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. एसआरए कार्यालयाबाहेर त्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. यावेळी गरम होत असल्याने रोहित पवार यांनी जॅकेट काढून माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. यानंतर ते थेट ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले.

रोहित पवार यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर वारंवार निशाणा साधला जातोय. ते राजकारणात प्रचंड सक्रिय आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आज दुपारी मुंबईच्या वांद्रे येथील एसआर कार्यालयात भेट दिली. तिथे त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली होती. मुंबईत रखडलेल्या एसआरए प्रकल्पाची त्यांनी आयुक्तांना माहिती दिली. तसेच बाधितांना भाडे देण्याची देखील विनंती केली. यासोबतच त्यांनी एसआरए कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.

एसआरए कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते अचानक ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आता रोहित पवार यांनी स्वत: अधिकृतपणे या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

“गेले २-३ दिवस तब्येत साथ देत नसल्याने आणि याबाबत आज माध्यमांमधील बातम्या पाहून अनेक हितचिंतक फोन करतायत. आपल्या काळजीबद्दल धन्यवाद, पण काळजीचे काहीही कारण नाही. व्हायरल फ्लू किंवा इतर काही कारण आहे का, याबाबत तपासणी सुरू आहे”, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

“खरं तर डॉक्टरांनी आजार अंगावर न काढता सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला, पण युवा पिढी शांत बसणारी नसते. तुमच्या सदिच्छाही पाठीशी आहेतच. त्यामुळं पुढील काही दिवस पती, मुलगा, वडील, भाऊ, जावई, मित्र या कौटुंबिक नात्यांसाठी जमेल तशी विश्रांती घेणार आहे. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांप्रती असलेलं कर्तव्यही प्रामाणिकपणे पार पाडतच राहणार आहे. लवकरच पूर्णतः बरा होऊन नव्या ऊर्जेने असंच काम सुरु राहील”, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.

रोहित पवार उद्या पत्रकार परिषद घेणार

दरम्यान, रोहित पवार यांनी उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. MHT-CET आणि स्पर्धा परीक्षेच्या इतर पेपरांमधील गैरप्रकाराबाबत उद्या (मंगळवार, दि. ४ ऑगस्ट) मुंबईत सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं आहे.